गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता; 50 लाखांचे बक्षीस अन् ट्रॉफी केली नावावर
Gaurav Khanna हा बिग बॉस 19 चा विजेता ठरला आहे. त्याने 50 लाखांचे बक्षीस अन् ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
Gaurav Khanna becomes the winner of Bigg Boss 19; gets a prize of 50 lakhs and a trophy : रविवारी ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले एपिसोड सुरू झाल्यापासून (Big Boss) यंदाचा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यानंतर अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं कारण यामध्ये बिग बॉसच्या घरातील गौरव खन्ना, आणि फरहाना भट्ट या दोन फानलीस्टमधून गौरव खन्ना हा बिग बॉस 19 चा विजेता ठरला आहे. त्याने 50 लाखांचे बक्षीस अन् ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; महत्त्वाची आणि निर्णायक भेट ठरणार?
ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या सिझनची अखेर रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी सांगता झाली आहे. यामध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहोचले होते. यापैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण आपल्या नावे करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.
टीकेचा पश्चाताप नाही, पण राणे साहेबांनी सांगितले म्हणून भास्कर जाधवांनी मला… निलेश राणेंची कबुली
मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धक बाद झाले होते. त्यामुळे टॉप 3 मध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली होती. त्यात दोन चर्चेतल्या स्पर्धकांना बिग बॉसचं घर सोडावं लागलं आहे. गायक अमाल मलिकला आधी बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं. त्यानंतर स्पिरीच्युअल इन्फ्लुएन्सर तान्या मित्तलचं एविक्शन झालं. त्यामुळे बिग बॉसच्या घरात फक्त गौरव खन्ना, प्रणित मोरे आणि फरहाना भट्ट हे तीन स्पर्धक राहिले होते.
नाताळच्या सुट्टीत येतोय प्रथमेश परब; “गोट्या गँगस्टर” चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच
अमाल मलिक हा बिग बॉस 19 मधील स्ट्राँग स्पर्धक मानला जात होता. बिग बॉसच्या घरातील त्याचा प्रवास अत्यंत रंजक होता. कधी विनोदबुद्धीने तर कधी रागाने त्याने आपली खेळी इतरांपेक्षा वेगळी ठेवण्याचा प्रयत्न केला. बशीर अली, शहबाज गिल, झीशान कादरी यांच्यासोबत त्याची जोडी चांगली रंगली. अमाल मलिकच्या गँगच्या मस्तीला प्रेक्षकांनीही खूप एंजॉय केलं. याशिवाय संगीतकार अमाल मलिकचा रागसुद्धा प्रेक्षकांना प्रसंगी पहायला मिळाला. फरहाना भट्टसोबत त्याची अनेकदा भांडणं झाली. इतकंच नव्हे तर प्रणित मोरेशीही तो कित्येकदा भिडला. एका एपिसोडमध्ये त्याने अभिषेक बजाजला मारहाणसुद्धा केली.
एक अॅनाकोंडा अन् दोन विषारी साप; आदित्य ठाकरेंची एका वाक्यात खरमरीत टीका…
दुसरीकडे तान्या मित्तल तिच्या बडेजाव करण्याच्या स्वभावामुळे चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात 800 साड्या आणण्यापासून, 150 बॉडीगार्ड्स आणि फाइव्ह स्टार हॉटेलसारखं घर यांसारख्या बढायांमुळे तान्याने कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा व्हालं लागलं होतं. तान्या अनेकदा तिच्या ड्रामेबाज स्वभावामुळे चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात फरहानासोबत तिची अनेकदा भांडणं झाली. मात्र यामध्ये शोमध्ये एकदा आपणच जिंकणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या गौरव खन्नाने बाजी मारली आहे.
