टीकेचा पश्चाताप नाही, पण राणे साहेबांनी सांगितले म्हणून भास्कर जाधवांनी मला… निलेश राणेंची कबुली

Nilesh Rane यांनी नारायण राणेंच्या सूचनेनंतर भास्कर जाधवांनी त्यांच्यावरील टीकेसाठी आपल्याला माफ करावं अशी प्रांजळ कबूली दिली आहे.

Nilesh Rane

Nilesh Rane on Bhaskar Jadhav forgive him for criticism after Narayan Rane’s instructions : गेल्या काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी कणकवलीमध्ये नारायण राणेंवर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना निलेश राणे यांची जीभ घसरली होती. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये निलेश राणेंनी जाधवांनी आपल्याला माफ करावं अशी प्रांजळ कबूली दिली आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

राणे साहेब म्हणाले, तुझ्यामुळे माझे आणि भास्कर जाधवांचे संबंध खराब झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर तू जा आणि त्यांना जे काही सॉरी म्हणायचं आहे. दिलगिरी व्यक्त करायची आहे ते सगळं त्यांच्याशी बोल. कारण तुझ्यामुळे आमचे घरचे संबंध खराब झाले. त्यावर मी राणे साहेबांना म्हटलं की, ज्या सभेमध्ये तुम्हाला शिव्या घातल्या गेल्या ती सभा कुणीही दाखवली नाही. त्यावर सगळे हसत होते, टाळ्या वाजवत होते. त्यावेळी कणकवलीमध्ये राणेंना शिव्या घातल्या जात होत्या तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा तेथे होते.

नाताळच्या सुट्टीत येतोय प्रथमेश परब; “गोट्या गँगस्टर” चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच

त्यावर मी केवळ प्रतिक्रिया दिली. मी म्हटलं की, मी खूप टोकाचं बोलणार आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला हे सभेचं ठिकाण सोडायचं आहे त्यांनी हे सभेचं ठिकाण सोडावं. तसेच मला जरी भास्कर जाधवांसोबत दिलगिरी व्यक्त करायला सांगितली असली तरी मी अद्याप त्यांना भेटलेलो नाही. त्यावेळी माझ्या तोंडून काही अपशब्द निघाले असतील.पण त्यांनी माझ्या आई-वडिलांबद्दल काही बोललं नसतं तर मी ही काही बोललो नसतो. त्यामुळे मला त्यांना बोलल्याचा पश्चाताप नाही पण राणे साहेबांनी सांगितले आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की, त्यांनी मला माफ कारावं.

 

follow us