नाताळच्या सुट्टीत येतोय प्रथमेश परब; “गोट्या गँगस्टर” चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच
Gotya Gangster या चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच करण्यात आला आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील गोट्या भाय या गाण्यावरचा हा टीजर लक्षवेधी आहे.
Prathamesh Parab is coming during the Christmas holidays; Unique teaser of the film “Gotya Gangster” launched :
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच करण्यात आला आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील गोट्या भाय या गाण्यावरचा हा टीजर लक्षवेधी असून, नाताळच्या सुट्टीत २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
एक अॅनाकोंडा अन् दोन विषारी साप; आदित्य ठाकरेंची एका वाक्यात खरमरीत टीका…
अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित गोट्या गँगस्टर या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुतकर्ता आणि सहनिर्माता ऋतुजा पाटील , शिव लोखंडे आहेत तसेच अससोसिएट निर्माता शिवाकांत तिवारी आहेत . राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय; 10 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार…
मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. आणि त्यानंतर सुरू होतात विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, खुसखुशीत संवाद, दमदार दिग्दर्शन, उत्तम अभिनय या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री नेमायचे, पण विरोधी पक्षनेता नाही; जाधवांनी खास शैलीत सरकारला घेरलं…
बाबू बँड बाजा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यांनी गोट्या गँगस्टर चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र, त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता त्यांचा शेवटचाच चित्रपट ठरलेला गोट्या गँगस्टर आता २६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.
