प्रणित मोरे आऊट, रुग्णालयात दाखल; Bigg Boss 19 मध्ये काय घडलं?
प्रणित मोरे तब्येतीच्या कारणाने ‘बिग बॉस 19’मधून बाहेर पडला असल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 19’ सध्या तुफान चर्चेत आहे. (Film) स्पर्धकांचे वाद आणि नाती सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे… पण आता बिग बॉसबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. ‘बिग बॉस 19’ शोचा प्रसिद्ध आणि दमदार खेळाडू प्रणित मोरे आऊट झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रणित याने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता तो आऊट झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे…
प्रणित मोरे आता ‘बिग बॉस 19’ मधून आऊट झाला आहे. असं सांगण्यात येत आहे. तर प्रणित याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 19’च्या घरात प्रणित मोरेला डेंग्यू झाला आहे. एक्सवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. जेथे प्रणित याला डेंग्यू झाला असं सांगण्यात आलं आहे.
Deepika Padukone : दीपिका पदुकोणची ‘लेडी सिंघम’, हिला पूर्ण झाले एक वर्ष!
डेंग्यू झाल्यामुळे प्रणित याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची देखली माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी प्रणित याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. प्रणित याची प्रकृती स्थिन नसल्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक् केली आहे. सध्या सर्वत्र प्रणित याची चर्चा सुरु आहे.
प्रणित मोरे तब्येतीच्या कारणाने ‘बिग बॉस 19’मधून बाहेर पडला असल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर प्रणित याची पुन्हा ‘बिग बॉस 19’ मध्ये एन्ट्री होणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे… सांगायचं झालं तर, शेहबाज आणि प्रणित यांच्यामध्ये घरातील सदस्यांनी प्रणित याला कॅप्टन केलं. आठवडाभर कॅप्टन्सीची जबाबदारी सांभाळ्यानंतर प्रणित याला चांगला पाठिंबा मिळाला..
प्रणित मोरे याच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रणित सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरही त्याचे सबस्क्राइबर्सची संख्या मोठी आहे. इंस्टाग्रामवर 2 हजारांहून अधिक पोस्ट करणाऱ्या प्रणितला इंस्टाग्रामवर 4 लाख 31 हजार नेटकरी फॉलो करतात. त्याचे इंस्टाग्राम अकाउंट त्याच्या कॉमेडी व्हिडिओंनी भरलेले आहे. तर युट्यूबवर त्याचे 10 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
