मोठी बातमी, बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकला दुबईत अटक

मोठी बातमी, बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकला दुबईत अटक

Abdu Rozik Arrested: कमी वेळेत भारतात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा प्रसिद्ध ताजिक गायक आणि बिग बॉस (Bigg Boss 16) स्टार अब्दु रोजिकला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यता आली आहे. अब्दु रोजिकला (Abdu Rozik) शनिवारी पहाटे 5 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dubai International Airport) अटक करण्यता आली असल्याची माहिती समोर आली आहे.

अब्दु रोजिकची मॅनेंजमेंट कंपनी खलिज टाईम्स ने देखील या वृत्ताची पुष्टी केली आहे. मात्र अब्दुला अटक का? करण्यात आली याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अब्दु रोजिक कोण आहे?

21 वर्षीय अब्दु रोजिक हा कमी उंची असूनही (ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे) मध्य पूर्वेतील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याच्याकडे यूएईचा गोल्डन व्हिसा आहे आणि तो अनेक वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहे. त्याने त्याच्या गाण्यां, व्हायरल व्हिडिओ आणि ‘बिग बॉस 16’ सारख्या रिलिटी शोद्वारे खूप लोकप्रियता मिळवली आहे. अब्दु रोजिकने दुबईतील कोका-कोला अरेना येथे बॉक्सिंगमध्ये 2024 मध्ये पदार्पण केले होते आणि यूकेमध्ये त्याचा रेस्टॉरंट ब्रँड ‘हबीबी’ लाँच केला होता.

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार संजय जगतापांचा पक्षाला रामराम 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube