माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बाथरुममध्ये दोनदा बेशुद्ध पडले; रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बाथरुममध्ये दोनदा बेशुद्ध पडल्याचं समोर आलं असून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jagdeep Dhankhar

Jagdeep Dhankhar : देशाचे माजी उपराष्ट्रपदी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेकदा आरोग्याच्या समस्या उद्भवल्याने त्यांच्यावर दिल्लीत अखिल भारतीय आयुर्वेदिक विज्ञान संस्था रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. माहितीनुसार ते 10 जानेवारीला बाथरुममध्ये दोनवेळा बेशुद्ध पडल्याचं समोर आलंय.

मोठी बातमी! अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, श्रीकांत शिंदेंचा भाजपला दणका

१० जानेवारी रोजी धनखड हे बाथरूममध्ये दोनदा बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये नेण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीसाठी दाखल करण्याचा सल्ला दिला आणि एमआरआय देखील काढण्यात आला.

जगदीप धनखड यापूर्वीही अनेक ठिकाणी बेशुद्ध झाले आहेत. ज्यामध्ये कच्छचे रण, उत्तराखंड, केरळ आणि दिल्ली यांचा समावेश आहे. त्यांनी उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. यानंतर त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव २१ जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.

डिजे लावून करायचे काय? आमदार संग्राम जगताप यांचा विरोधकांवर निशाणा, प्रभाग एकमध्ये जोरदार सभा

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै २०२५ रोजी सुरू झाले. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिवसभर राज्यसभेचे कामकाज अध्यक्षपद भूषवले आणि त्यानंतर धनखड यांचा राजीनामा उपराष्ट्रपतींच्या अधिकृत एक्स अकाउंटवर त्याच रात्री दिसला.

आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल आणि कोणत्या संधी मिळतील?; काय सांगतं आजचं राशिभविष्य?

आरोग्याच्या कारणांचा त्यांनी उल्लेख केला होता. तर विरोधी पक्ष आणि अनेक राजकीय विश्लेषकांनी त्यांच्या अचानक राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यामागील कारण आरोग्य नाही तर दुसरे काहीतरी असल्याचे म्हटले होते.

follow us