देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींचं नाव ठरलं? दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, भेटीगाठी अन् बैठकांना उधाण

JDU Leader Ramnath Thakur In Vice President Post Race : उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजधानी दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर (Jagdeep Dhankhar Resignation) आता देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी नवा चेहरा शोधण्याची प्रक्रिया सुरू झालीय. अशा पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारच्या एका मातब्बर नेत्याची (Ramnath Thakur) भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे या नेत्याचे नाव आता उपराष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असल्याचं मानलं जातंय.
रामनाथ ठाकूर संभाव्य उमेदवार?
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर सध्या उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य व्यक्तीच्या निवडीसाठी चर्चा सुरू आहेत. अनेक नेत्यांची नावे चर्चेत असतानाच 23 जुलै रोजी जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय कृषीराज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांचे मुलगा आहेत. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर काही वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.
मोदी-शहांनी निर्माण केलेली ‘विंचवांची शेती’; ठाकरेंचं मुखपत्र निवडणूक आयोगावर भडकलं
सूत्रांच्या माहितीनुसार, रामनाथ ठाकूर यांचं नाव उपराष्ट्रपतीपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून समोर आलंय. विशेषतः जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांनी थेट त्यांच्या घरी जाऊन भेट घेणं, ही बाब अत्यंत लक्षवेधी ठरत आहे.
मोदींचे विश्वासू आणि ठाकूरांचा वारसा
रामनाथ ठाकूर हे केवळ बिहारपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांच्या वडिलांच्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. गेल्यावर्षीच केंद्र सरकारने कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता, त्यामागेही रामनाथ ठाकूर यांचे योगदान असल्याचं मानलं जातं. यामुळे ठाकूर यांचं नाव या पदासाठी प्रबळ मानलं जातंय.
आज तुमच्या नशिबात काय? आर्थिक स्थिती कशी असेल? घ्या जाणून…
उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील निवडून आलेले तसेच नामनिर्देशित खासदार मतदान करणार आहेत. आयोगाने सांगितलं की, प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर अधिकृतपणे निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येईल.