गिरीश महाजनांची मोठी घोषणा…अयोध्येच्या धर्तीवर महाराष्ट्रात श्रीराम मंदिर
अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या तपोवनात श्रीराम मंदिर बांधणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी सिडकोतील सभेत केलीयं.
Girish Mahajan : महापालिका निवडणुकीदरम्यान, राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं असतानाच आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठी घोषणा केलीयं. अयोध्येतील मंदिराच्या धर्तीवर नाशिकच्या तपोवनात श्रीराम मंदिर बांधण्याची घोषणा महाजन यांनी केलीयं. नाशिकमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
पोलिसांचा छापा अन् उमेदवाराला हार्ट अटॅक, अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये काय घडलं?
पुढे बोलताना ते म्हणाले, मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक हे शहर चर्चेत आहे. नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या शहराला सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. त्या दृष्टीने या शहराच्या विकासावर आमचे खास लक्ष असणार आहे. नाशिकला तपोवनात अयोध्येतील मंदिराच्या धर्तीवर श्री राम मंदिर बांधणार असल्याचं महाजन म्हणाले आहेत.
प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत १०० % “कमळ” फुलणार, राहुल कलाटे यांना विश्वास
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. शिवसेना आणि मनसेच्या मुंबईतील सभेची महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये चर्चा होत आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
पुण्यात प्रचाराच्या धामधूमीत खळबळ; भाजप उमेदवार गणेश बिडकरांवर हल्ल्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल…
सिडको येथील भाजपच्या उमेदवारांसाठी गिरीश महाजन यांनी सोमवारी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी राम मंदिराबाबत घोषणा केल्याने ही सभा मतदारांमध्ये चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
