मराठी माणूस अडचणीत असेल तर… तुम्ही तीस वर्षे गोट्या खेळत…ठाकरे बंधूंवर देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

Devendra Fadanvis : कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून मुंबई तुटू शकत नाही. तुम्हाला आज मराठी माणूस कुठे तरी अडचणीत दिसतोय.

  • Written By: Published:
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis on Uddhav and Raj Thackeray: मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची जोरदार सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे (Uddhav and Raj Thackeray) बंधूंवर जोरदार निशाणा साधलाय. तीस वर्षे मुंबईवर तुमची सत्ता होती. तुम्ही केवळ खुर्च्या तोडल्या. मराठी माणूस व मुंबईसाठी काय केलं. केवळ गोट्या खेळत होता का ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून मुंबई तुटू शकत नाही. तुम्हाला आज मराठी माणूस कुठे तरी अडचणीत दिसतोय. मराठी माणसांवर खतरा दिसतोय तर तुम्ही तीस वर्षे काय गोट्या खेळत होता का ? पंचवीस वर्षे या महापालिकेमध्ये खुर्च्या तोंडण्याचे काम तुम्ही केलं. जर मराठी माणूस अडचणीत असेल तर तुम चुल्लू भर पानी में डूब मरो, कहाँ व्होट माँगना यहा आतें है !


तुमचे अस्तित्वपणाला लागलंय-फडणवीस

तुम्ही सांगता मराठीचे अस्तित्व संपवून जाईल. पण तुमचे अस्तित्वपणाला लागले आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही. तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही. येथे बसलेली जनता मुंबई व महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांनी तयार केलेला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही.


काकांना नक्कल तरी करता येते…

आदित्य ठाकरेंनी काल माझी नक्कल केलीय. पण मी सांगतो, नक्कल करता करता काकांच्या पक्षाची अवस्था काय झाली. काकांना नक्कल तरी करता येते. भाषण करता येतं. तुमची अवस्था काय आहे ? असा टोला आदित्य ठाकरे यांना फडणवीसांनी लगावलाय.


विकासावर बोलायचे असेल तर मर्द व्हावे लागतं-फडणवीस

खोटं पण रेटून बोलं, अशी त्यांची पद्धत आहे. त्याचा पर्दाफाश करण्यासाठी मी आलो आहे. सगळ्या प्रोजेक्टचे तुम्ही बारसं केलयं. शेजारचं पोरंग मांडीवर बसविता आणि आमचे पोरंग आहे, सांगता. या मुंबईला माहिती आहे. कुणी केलंय मुंबईसाठी. विकासावर बोलायचे असेल तर मर्द व्हावे लागतं. आता कोणामध्ये मर्दांगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही, असे फडणवीस म्हणाले.


बाळासाहेबांना ठाकरे काय वाटतं असेल?

माझ्या आई-वडिलांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. माझ्या बापाने आणीबाणीमध्ये दोन वर्षे जेलमध्ये घातले आहेत. माझा बाप स्वयंसेवक होता. मी त्यांचा पोरगा आहे. आज माझा बाप स्वर्गातून मला पाहत असेल, तेव्हा त्यांना आनंद होतं असेल, माझं हिंदुत्व माझ्या मुलाने चालविले आहे. तुमचे पिताश्री हिंदुह्यद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून पाहत असतील, त्यावेळी त्यांना काय वाटतं असेल. आता माझा मुलगा रशिद मामूबरोबर बसायला लागला आहे. हे बघितल्यावर त्यांना काय वाटतं असेल, असे फडणवीस म्हणाले.

follow us