पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार संजय जगतापांचा पक्षाला रामराम

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार संजय जगतापांचा पक्षाला रामराम

Sanjay Jagtap : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात (Pune) पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर- हवेलीचे माजी आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याची माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे संजय जगताप लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

संजय जगताप यांनी आपला राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांना ई-मेलद्वारे पाठवला आहे. तसेच त्यांनी आपला राजीनामा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडेही पाठवला आहे. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे काही माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांची भेट घेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केले होते.

ऑस्ट्रेलिया संघाचा मोठा निर्णय, ‘हा’ स्टार गोलंदाज संघातून आऊट; कारण काय?

संजय जगताप यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय जगताप यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. पुरंदर मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बाजी मारली होती. शिवतारे यांनी संजय जगताप यांचा 24,188 मतांनी पराभव केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube