तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; महत्त्वाची आणि निर्णायक भेट ठरणार?

Sayaji Shinde यांनी कुंभमेळ्यासाठी केल्या जाणाऱ्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंच्या भेटीला गेले. ही भेट निर्णायक ठरणार आहे

Sayaji Shinde

Actor Sayaji Shinde Meet Raj Thackery against deforestation in Tapovan : नाशिकमध्ये 2027ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये नाशिकमध्ये असलेल्या तपोवनमध्ये साधूंच्या राहण्याची सोय करण्यासाठी जागा हवी आहे. त्यासाठी वृक्ष तोड केली जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यामुध्ये वृक्ष लागवडीसाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्याच दरम्यान मनसेकडून तपोवनमध्ये वृक्षतोडीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीला अभिनेते सयाजी शिंदे

तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान राज ठाकरे यांच्या मनसेने याविरूद्ध आंदोलन केलं होतं. तसेच शिंदे देखील पहिल्यापासून या प्रकरणी आक्रमक झालेले आहेत. या भेटीचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर देखील आहेत.

टीकेचा पश्चाताप नाही, पण राणे साहेबांनी सांगितले म्हणून भास्कर जाधवांनी मला… निलेश राणेंची कबुली

कारण खोपकर यांच्या नेतृत्त्वामध्येच मनसेने तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन केले होते. अनेक कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते.त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वृक्षतोडीच्या संदर्भात सयाजी शिंदे यांनी आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भेट निश्चितच महत्त्वाची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे अशी चर्चा रंगत आहे.

follow us