पुतीन अन् ट्रम्पमध्ये फोनवरून तब्बल एक तास चर्चा; पुतीन यांनी युद्ध थांबवण्याचा प्लॅन दिला?

Putin and Trump यांनी फोनवरून संवाद साधला. हा संवाद तब्बल एक तासचा होता. यामध्ये इराणमधील संघर्षावर चर्चा झाली. असल्याचे देखील बोलले जात आहे.

Putin And Trump

Iran Israel War Putin and Trump had a phone conversation for an hour; Putin gave a plan to stop the war : आखातामध्ये इराण विरुद्ध इस्राईल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या युद्धादरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हा संवाद तब्बल एक तासचा होता. यामध्ये इराणमधील संघर्षावर चर्चा झाली. असल्याचे देखील बोलले जात आहे.

धक्कादायक! सीबीएसई 12 वी प्रश्नपत्रिकेत थेट युट्युब व्हिडीओचा क्यूआर, नेमकं काय घडलं?

रशियन मीडियाच्या रिपोर्टनुसार या फोन कॉलवर पुतीन यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर त्यांची प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात आखाती देशांच्या नेत्यांशी विशेषत: खामेनेईंशी झालेल्या चर्चेची माहिती ट्रम्प यांनी दिली. यावेळी ट्रम्प यांनी देखील त्यांची मतं मांडली. या सर्व मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा झाली आहे. त्यामुळे आता युद्ध कधी थांबणार? त्याचबरोबर पुतीन यांनी ट्रम्प यांना युद्ध थांबवण्यासाठी प्लॅन देखील देण्याचा दिल्याच्या चर्चा आहेत.

नंदकिशोर कागलीवाल यांना विज्ञानातील मानद डॉक्टरेट प्रदान

या फोनकॉल बाबत क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी माहिती दिली.  डिसेंबरनंतर ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील संवाद आहे. दुसरीकडे या  युद्धाचा फटका आता जगाला बसताना दिसत आहे. या युद्धामुळे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल मालवाहू जहाजे बंद केल्याने याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झाला आहे. भारतासह अनेक देशात आता तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असला की किंमक वाढते या नियमानुसार आता जगभरामध्ये क्रुड ऑईलच्या किंमती वाढल्या आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या किंमतीत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रति बॅरल 110 डॉलर एवढे पैसे मोजावे लागणार आहेत.

follow us