Welcome To The Jungle : बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपट, ‘वेलकम टू द जंगल’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Welcome To The Jungle : ही एक अशी फ्रँचायझी आहे, जिच्या आयकॉनिक ट्यूनच्या केवळ उल्लेखानेच लोक हसून लोटपोट होतात आणि प्रेक्षक
Welcome To The Jungle : ही एक अशी फ्रँचायझी आहे, जिच्या आयकॉनिक ट्यूनच्या केवळ उल्लेखानेच लोक हसून लोटपोट होतात आणि प्रेक्षक तिच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. हा एक विनोदी धमाका आहे जो मनसोक्त हास्य, भव्य-दिव्य वेडेपणा आणि नॉन-स्टॉप मनोरंजनाचे वचन देतो. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 26 जून 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
अनोखा विनोद, अविश्वसनीय प्रसंग आणि पोट धरून हसायला लावणारे क्षण, सोबतच हाय-ऑक्टेन ॲक्शन आणि ब्लॉकबस्टर संगीताच्या मिश्रणाने परिपूर्ण, ‘वेलकम टू द जंगल’ मोठ्या प्रमाणावर हाय- एनर्जी कॉमेडी सादर करतो. गोंधळ, आकर्षण, धमाके आणि मनमोकळ्या मजेचे मिश्रण असलेला हा चित्रपट एक संपूर्ण हास्यकल्लोळ घडवण्यासाठी तयार करण्यात आला आहे, जो प्रेक्षकांना आश्चर्यांनी, पंचलाइन आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेली एक आनंददायी सफर घडवतो.
अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल‘ मध्ये 30 हून अधिक कलाकारांचा एक मोठा संच आहे, ज्यापैकी प्रत्येकजण प्रतिभेचा मानदंड आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो, जे मोठ्या पडद्यावर एक दुर्मिळ संयोजन आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, परेश रावल, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, आफताब शिवदासानी, लारा दत्ता, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, दलेर मेहंदी, फरिदा जलाल, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, किरण कुमार, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, विंदू दारा सिंग, नवाब शाह, उर्वशी रौतेला, पुनीत इस्सर, अर्जुन फिरोज खान, दिवंगत पंकज धीर, सुदेश बेरी, हेमंत पांडे, झाकीर हुसेन, सयाजी शिंदे आणि इतर अनेकजण एकत्र येऊन एक भव्य मनोरंजन सादर करणार आहेत.
अॅटलीसाठी दीपिका पादुकोण‘लकी चार्म’; AA22XA6 मध्ये दिसणार नवा अवतार-
एए नाडियाडवाला आणि स्टार स्टुडिओ 18 , केप ऑफ गुड फिल्म्स आणि सीता फिल्म्स यांच्या सहकार्याने सादर करत आहेत, ‘वेलकम टू द जंगल’ हा बेस इंडस्ट्रीज ग्रुप आणि सीता फिल्म्स प्रोडक्शनचा चित्रपट असून अहमद खान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 26 जून 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
