मिथिला पालकर साकारणार अक्षय कुमारची बहीण; ‘भूत बंगला’मध्ये खास भूमिका
Bhooth Bangla Movie : या चित्रपटाने या जोडीच्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांवर वाढलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली.
Bhooth Bangla Movie: ‘भूत बंगला’ (Bhooth Bangla Movie) हा 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॉलिवूडची ‘ओजी’ जोडी. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि Priyadarshan (प्रियदर्शन) यांचे तब्बल 16 वर्षांनंतर होणारी दमदार पुनरागमन. बालाजी मोशन पिक्चर्सच्या (Balaji Motion Pictures) बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाने या जोडीच्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांवर वाढलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. त्यांच्या खास विनोदशैलीचा आणि खळखळून हसवणाऱ्या जादूचा अनुभव पुन्हा मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
‘छावा’ ते ‘राजा शिवाजी’! विकी कौशलची छत्रपती शिवाजी महाराजांना ‘आबासाहेब’ या नात्याने आदरंजली
या प्रतिक्षेत आणखी भर घालत अक्षय कुमार यांनी नुकतेच चित्रपटाच्या कलाकारांमध्ये एका नव्या नावाची भर घातली आहे. ते नाव आहे मिथिला पालकर (Mithila Palkar) हिचे. अक्षय यांनी सांगितले की, मिथिला या चित्रपटात त्यांच्या बहिणीची भूमिका साकारणार आहेत. या फ्रेश कास्टिंगमुळे कथेत एक नवा ट्विस्ट आलाय. आता चाहत्यांना या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
सकाळपर्यंत सांगितलं बंडखोरी करणार नाही पण त्यांनी… रविंद्र चव्हाण भिवंडी प्रकरणावर संतापले
अक्षय कुमार म्हणाले, मिथिलाने तिचा प्रवास इंटरनेटपासून सुरू केला आणि आज ती अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. आणि लवकरच ती एका अशा अभिनेत्यासोबत दिसणार आहे ज्याला मी खूप चांगले ओळखत. ओळखा पाहू कोण? मी स्वतः! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला ‘भूत’ नाही, तर माझ्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली ‘गोरेगाव चित्रनगरी’
चाहत्यांमध्ये ‘भूत बंगला’बद्दल प्रचंड उत्साह आहे. हा चित्रपट केवळ अक्षय आणि प्रियदर्शन यांच्या जोडीचे पुनरागमनच नाही, तर एक परिपूर्ण फॅमिली एंटरटेनर ठरणार आहे. यात भरपूर विनोद, मजेशीर गोंधळ आणि भावनिक क्षणांचा संगम पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना अक्षयकुमार त्यांचा जुना अंदाज आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगसह पाहण्याची अपेक्षा आहे, तर प्रियदर्शन यांचा खास देसी टच पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
Balaji Motion Pictures आणि Cape of Good Films यांच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार यांच्यासोबत Wamiqa Gabbi, Paresh Rawal, Tabu आणि Rajpal Yadav यांसारखे दिग्गज कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार, Shobha Kapoor आणि Ekta Kapoor आहेत. तयार राहा — ‘भूत बंगला’ 10 एप्रिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहांत येणार आहे.
