‘छावा’ ते ‘राजा शिवाजी’! विकी कौशलची छत्रपती शिवाजी महाराजांना ‘आबासाहेब’ या नात्याने आदरंजली

अत्यंत महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
Viki

शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता (Actrees) आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले. या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या कमेंटची.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली ;गोरेगाव चित्रनगरी

छावा’ चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने, रितेश देशमुख यांच्या पोस्टवर “आबासाहेब ” अशी कमेंट करत रितेशला मानाचा मुजरा दिला आहे. ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून ‘शंभूराजेंनी शिवरायांना दिलेली ही साद’ असल्याचे म्हटले जात आहे.

केवळ विकीच नाही, तर चित्रपटसृष्टीतील सायली संजीव, मिलाप झवेरी, रमेश तौरानी, विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, अमृता खानविलकर, मनीष पॉल, राहुल देव, लिझेल रेमो डिसूझा आणि मुश्ताक शेख यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आणि निर्मात्यांनी देखील पोस्टर शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

follow us