‘हैवान’ चा दमदार टीझर होणार प्रदर्शित; अक्षय कुमार, सैफ अली खान मुख्य भूमिकेत
Haiwaan Teaser : अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला 'हैवान' 12 ऑगस्ट रोजी टीझर प्रदर्शित करण्यास सज्ज झाला आहे.
Haiwaan Teaser : अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘हैवान’ 12 ऑगस्ट रोजी टीझर प्रदर्शित करण्यास सज्ज झाला आहे. ‘हैवान’ चा प्रभावी ‘फर्स्ट लूक’ समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट उद्या (12ऑगस्ट) आपला बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित करणार असून, त्याद्वारे प्रेक्षकांना प्रियदर्शन यांच्या रोमांचक विश्वाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.
उत्कंठावर्धक आणि थरारक असलेल्या या चित्रपटात बोमन इराणी (Boman Irani) , सैयामी खेर (Saiyami Kher) आणि श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘हैवान’ ची निर्मिती KVN प्रॉडक्शन्स (KVN Productions) आणि थेस्पियन फिल्म्सच्या (Thespian Films) बॅनरखाली वेंकट के. नारायण आणि शैलजा देसाई फेन यांनी केली आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram