Ghumar: अभिषेक बच्चन अन् सैयामी खेरच्या आगामी ‘घुमर’चा फर्स्ट लूकआउट ! 

Ghumar: अभिषेक बच्चन अन् सैयामी खेरच्या आगामी ‘घुमर’चा फर्स्ट लूकआउट ! 

Ghumar First look out: ऑगस्ट महिना बॉलिवूडसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अनेक दिग्ग्ज स्टार्सचे सिनेमे या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहेत. ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडी भाईचा ‘ओह माय गॉड २’ (Oh my god 2) आणि सनी देओलचा ‘गदर २’ (Gadar 2) हे हटके सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सध्या या दोन्ही सिनेमाची जबरदस्त हवा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ देखील ऑगस्ट महिन्यातच येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)


आता बिग बी यांच्या चिरंजीवाचे म्हणजेच अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) आगामी ‘घुमर’ (Ghumar) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. आर बल्की दिग्दर्शित ‘घुमर’ या सिनेमाचे नुकतंच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिषेकने त्याच्या सोशल मीडिया (Social media) हॅंडलवर हे या सिनेमाचे एक पोस्टर शेअर केलं आहे. सिनेमा एका विकलांग खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर असल्याचे सांगितले जात आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेर ही निभावणार असल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतंच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)


यामध्ये संयामीचा एक हात नसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ती अत्यंत आत्मविश्वासाने दुसऱ्या हातात क्रिकेटचा बॉल घेऊन उभी असलेली बघायला मिळत आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहे. या पोस्टरमध्ये अभिषेकचा लूक देखील चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसत आहे. हा सिनेमा वास्तववादी परिस्थितीचं चित्रण करणार अशी अपेक्षा चाहत्यांना वाटत आहे.

तसेच लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अभिषेकने याअगोदर आर. बल्की यांच्यासह ‘पा’ या सिनेमात काम केलं आहे. ‘घुमर’ हा सिनेमा १८ ऑगस्ट दिवशी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्यासारखे काही हटके कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

Gashmir Mahajani: चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर थेटच म्हणाला, “मी माझ्या…”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube