‘दशमी’ची थरारक गर्जना! चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Dashami Official Trailer : . येत्या 23 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Dashmi

Dashami Official Trailer : अन्याय कितीही मोठा असो…त्याच्याविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य त्याहून मोठं असतं! जेव्हा संघर्षाची ठिणगी पेटते, तेव्हा बदल अटळ असतो…याच संघर्षाची थरारक कहाणी घेऊन येत आहे. ‘दशमी’ केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट सस्पेन्स, क्राईम, थरार आणि सामाजिक वास्तव यांची दमदार सांगड घालत प्रेक्षकांना एका वेगळ्याच सिनेमॅटिक विश्वात घेऊन जाणार आहे. ‘प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी ‘दशमी’ हा विचार केंद्रस्थानी ठेवत चित्रपटाची कथा उलगडत जाते. येत्या 23 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.

विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला, देवी दुर्गेने महिषासुराचा संहार केला… पण आजच्या काळातील अन्यायाविरुद्ध कोण उभे राहणार? याच प्रश्नाला थरारक आणि रहस्यमय पद्धतीने भिडणारा ‘दशमी’चा प्रवास प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे. ‘दशमी’ची कथा रहस्याच्या अनेक स्तरांनी विणलेली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथानकातील प्रत्येक धागा प्रेक्षकांना वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे. नवे प्रश्न, अनपेक्षित वळणे, वाढता तणाव आणि धक्कादायक खुलासे यामुळे पडद्यावर नेमकं पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधणं कठीण होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘दशमी’ हा केवळ रहस्य आणि थराराचा खेळ नाही, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद देणारा विचार आहे. प्रत्येक मुलीने निर्भयपणे जगावं आणि तिच्या हक्कासाठी समाजानेही ठामपणे उभं राहावं, हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे, असे दिग्दर्शक योगेश भोसले सांगतात.

भव्य दृश्यरचना, दर्जेदार तांत्रिक बाजू आणि मोठ्या पडद्याला साजेसं सादरीकरण हे ‘दशमी’चं खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक फ्रेम बारकाईने साकारण्यात आली असून, मराठी सिनेमातील सस्पेन्स-क्राईम थ्रिलरला एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासोबत दाक्षिणात्य स्टार रवि प्रकाश महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची ताकद आणि रहस्याने भरलेली कथा यामुळे ‘दशमी’ची उत्सुकता आणखी वाढली आहे.

follow us