Rashibhavishya: आज कोणाचे नशीब चमकणार? कुणाला धनलाभ, तर कुणाच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग; वाचा 12 राशींचे भविष्य!

Rashibhavishya: ग्रह-नक्षत्रांची स्थिती पाहता काही राशींसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणार आहे.

Rashibhavishya: आज कोणाचे नशीब चमकणार? कुणाला धनलाभ, तर कुणाच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग; वाचा 12 राशींचे भविष्य!

Rashibhavishya Today 19 November 2026: आज गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026. ग्रह-नक्षत्रांची स्थिती पाहता काही राशींसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणार आहे, तर काहींना कामाच्या ठिकाणी अडचणी आणि कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुणाच्या आयुष्यात प्रेमाचे नवे क्षण फुलणार, तर कुणाला जुन्या समस्यांमधून मार्ग काढावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह नांदेडमधील चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी; मुंबईतून एकजणाला अटक

मेष

आज धावपळीच्या दिनक्रमातून स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेला मानसिक ताण कमी करण्यासाठी मनोरंजन आणि आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. गुंतवणुकीच्या नव्या संधी समोर येतील, मात्र कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. जोडीदाराच्या वैयक्तिक कामात हस्तक्षेप केल्यास नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांचे मत जाणून घेऊनच पुढे जा. प्रेमसंबंधात तुमच्या भावना प्रभावी ठरतील. भागीदारीत सुरू केलेल्या कामातून फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र सहकाऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागू शकते. मोबाइल आणि टीव्हीमध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा जोडीदाराशी संवाद साधा. वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि जवळीक वाढेल.

वृषभ

आज व्यायाम, मैदानी खेळ आणि योगाभ्यासासाठी वेळ द्या. यामुळे शरीरासोबत मनालाही प्रसन्नता मिळेल. एखाद्या जवळच्या मित्राच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील समस्या मनात ठेवण्याऐवजी कुटुंबीयांशी मोकळेपणाने बोला. अहंकारामुळे संवाद टाळल्यास अडचणी वाढू शकतात. कामाच्या वाढत्या व्यापामुळे मानसिक थकवा जाणवेल. त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात विश्रांती घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. घरातील कामे आटोपल्यानंतर मनोरंजनासाठी वेळ मिळेल. मात्र, जोडीदारासोबतच्या नात्यातील नाराजी दूर करण्यासाठी संवाद साधणे आवश्यक आहे.

मिथुन

आज मन शांत ठेवणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे महत्त्वाचे ठरेल. अतिरिक्त पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. मात्र, आनंदाच्या भरात स्वतःवरील नियंत्रण गमावू नका. प्रेमसंबंधात तुमचा हट्ट किंवा अधिकार गाजवण्याची वृत्ती टाळा. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या स्वार्थी वागण्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस अनुकूल आहे. जोडीदाराची साथ मिळाल्याने दिवस आनंदात जाईल.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई! 15 लाखांचे बक्षीस असलेला 22 वर्षीय दहशतवादी कमांडर लतीफ भट ठार

कर्क

आज स्वतःच्या आरोग्याकडे आणि व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. अनावश्यक खरेदी करण्याऐवजी उपलब्ध वस्तूंचा योग्य वापर करा. घरात नातेवाईकांचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधात एखादे अनपेक्षित सरप्राईज मिळू शकते. व्यावसायिक क्षेत्रात नवीन लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल. मनातील चिंता बाजूला ठेवण्यासाठी धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करू शकता. जोडीदाराची साथ आणि प्रेम यामुळे वैवाहिक आयुष्यात समाधान मिळेल.

सिंह 

आज खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळणे हिताचे ठरेल. घराबाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. कुटुंबातील नात्यांमध्ये प्रेम, त्याग आणि एकमेकांबद्दल कृतज्ञता जपल्यास वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधात काही कारणांमुळे मनस्थिती बदलू शकते. कामाच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून जाणवणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवताना काम आणि कुटुंबाकडेही दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदाराच्या काही निर्णयांमुळे तुमची चिडचिड होऊ शकते.

कन्या

आज तुमचा उत्साही आणि खेळकर स्वभाव अधिक खुलून येईल. नवीन मित्र जोडण्याची संधी मिळेल. मात्र, विचार न करता केलेल्या खर्चामुळे आर्थिक गणित बिघडू शकते. प्रेमसंबंधात काही अनपेक्षित क्षण अनुभवायला मिळतील. भागीदारीतील कामांमध्ये अपेक्षित यश मिळण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. इतरांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. स्वतःच्या चुका ओळखून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. मोकळ्या वेळेत पुस्तक वाचनाला प्राधान्य द्या. यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. जोडीदारासोबत मनातील भावना व्यक्त केल्याने नात्यातील गोडवा वाढेल.

Operation Tiger : ऑपरेशन टायगर 3, भास्कर जाधव सोडणार ठाकरेंची साथ? उदय सामंत म्हणाले…

तूळ

आज एखाद्या प्रसंगामुळे मनाला ठेच पोहोचू शकते. मात्र, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परिस्थितीवर मात कराल. आर्थिक लाभाची शक्यता असून त्यातील काही भाग सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च केल्यास मनाला समाधान मिळेल. ओळखीच्या व्यक्तींवर स्वतःचे निर्णय लादू नका. संयमाने परिस्थिती हाताळल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात भावनांना महत्त्व मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची कामगिरी करण्याची संधी मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचा योग्य वापर करा. जोडीदारासोबत जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने दिवस खास ठरेल.

वृश्चिक

आज मुलांसोबत खेळण्यात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्यात आनंद मिळेल. आर्थिक नियोजनासाठी घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. कामाचा व्याप वाढल्याने थकवा जाणवेल, पण मित्रांच्या सहवासामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधात ठरलेला प्लॅन रद्द होण्याची शक्यता असल्याने थोडी निराशा येऊ शकते. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन संधींचा शोध घ्या. मोकळ्या वेळेत चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आवडीनिवडी लक्षात घ्या. वैवाहिक आयुष्यात एकसुरीपणा जाणवू शकतो. नात्यात उत्साह टिकवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा.

Sonia Gandhi Book : दोन लाख प्रती, 26 कोटींचं उत्पन्न; सोनियांना किती पैसे मिळणार?

धनु

आज ध्यान आणि आत्मचिंतन केल्याने मनाला शांतता मिळेल. घर किंवा मालमत्तेशी संबंधित गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते. भावनांच्या भरात इतरांशी कठोर बोलणे टाळा. अन्यथा जवळच्या व्यक्तींपासून दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. दिवसाच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल, मात्र पुढे परिस्थिती अनुकूल होत जाईल. दिवस संपताना स्वतःसाठी वेळ काढता येईल. जवळच्या व्यक्तीची भेटही घडू शकते. जोडीदारासाठी केलेली एखादी खास कृती त्यांना आनंदित करेल.

मकर

आज निरर्थक वाद आणि चर्चांमध्ये वेळ घालवणे टाळा. अशा गोष्टींमुळे प्रश्न सुटण्याऐवजी मनस्ताप वाढू शकतो. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणींवर मार्ग निघेल. मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या आधीच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक किंवा प्रगतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल. मोकळ्या वेळेत वेब सीरिज पाहण्याचा आनंद घ्याल. मात्र, एखाद्या नातेवाईकाच्या अचानक भेटीमुळे ठरवलेले नियोजन बदलू शकते.

कुंभ

आज आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. आर्थिक अडचणींमुळे नवीन कल्पना सुचण्यात अडथळे येऊ शकतात. मात्र, निराश न होता उपलब्ध संधींचा विचार करा. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रेमसंबंधात अपेक्षाभंग होण्याची शक्यता असली तरी संयम सोडू नका. कामाच्या क्षेत्रात तुमच्यातील क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अनेक रखडलेली कामे पूर्ण करता येतील. कुटुंबातील काही कारणांमुळे वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र, दोघांच्या समजूतदारपणामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल.

पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीची शेतात आत्महत्या

मीन

आज काही अनपेक्षित घटनांमुळे मन विचलित होऊ शकते. अशा वेळी घाईघाईने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे परिस्थितीचा विचार करा. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन बचतीला प्राधान्य द्या. कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्याला मिळणार नाही, याची काळजी घ्या. कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, मात्र अचानक काम आल्याने नियोजनात बदल होऊ शकतो. जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढल्याने वैवाहिक आयुष्यात प्रेमाचे क्षण अनुभवायला मिळतील.

follow us