सिडनीच्या बोंडी बीचवर गोळीबार; गोळीबार करणाऱ्यासह 10 जणांचा मृत्यू

दोन व्यक्तींनी गोळीबार केल्याने सिडनीच्या बोंडी बीचवर मोठ्या प्रमाणात गोंधळ, गोळीबार करणाऱ्यासह 10 जणांचा मृत्यू.

  • Written By: Published:
Untitled Design (107)

Ten people have been killed in mass shooting : ऑस्ट्रेलियातील(Austrelia) स्थानिक वेळेनुसार 6:30 वाजता दोन व्यक्तींनी गोळीबार केल्याने सिडनीच्या(Sydney) बोंडी बीचवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान एका धाडसी व्यक्तीने झाडाच्या मागे लपलेल्या एका बंदूकधाऱ्याला खाली ओढले आणि त्याच्या हातातील रायफल परत त्याच्याकडे वळवली. त्याचे हे धाडस कॅमेऱ्यात कैद झाले. ज्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल(Viral video) झाला आहे. या 15 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उभ्या असलेल्या गाड्याच्या मागे लपून बसलेला दिसून येतो. तो मागून बंधूकधाऱ्याकडे पळत जातो, त्याला मानेपासून पकडतो आणि त्याच्या हातातली रायफल हिसकावून घेतो. आणि बंदूक त्याच्याकडे वळवतो तेव्हा बंदूकधारी जमिनीवर कोसळतो.

गोळीबाराच्या या घटनेत गोळीबार(Firing) करणाऱ्यांपैकी एका जनासह 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबार करणाऱ्या दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असून याबातची माहिती एन. एस. डब्लू पोलिसांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या गोळीबारात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले असून यात 2 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान ऑपरेशन सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Video : ठाकरेंच्या फक्त घोषणा; फडणवीस सरकारची थेट मदत, महाले काय म्हणाल्या?

गोळीबाराच्या घटनेविषयी सांगताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन्ही बंदूकधार्यंनी मिळून एकूण 50 गोळ्या झाडल्या. याबाबतची अधिकृत माहिती एन. एक्स. डब्लूने एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. एका घडणाऱ्या घटनेला आणि उत्तर देत आहोत. तसेच लोकांना या परिसरात न येण्याचं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

follow us