Imad Wasim : पाकिस्तानला धक्का! वर्ल्डकपनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती

Imad Wasim : पाकिस्तानला धक्का! वर्ल्डकपनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती

Imad Wasim : यंदाच्या विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी (World Cup 2023) अत्यंत निराशाजनक राहिली. विश्वचषकाचा दावेदार म्हणवल्या जाणाऱ्या या संघाला सेमी फायनलमध्येही प्रवेश करता आला नाही. यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर (Pakistan Cricket) त्यांच्याच देशात टीका होत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्डकप नंतर संघातील अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने (Imad Wasim) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इमाद बऱ्याच काळापासून संघाबाहेर होता त्यामुळेच कदाचित त्याने निवृत्त जाहीर केली असावी अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यानंतर पाकिस्तानी संघाला आता नवीन खेळाडूंचा शोध घ्यावा लागणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये भूकंप; बाबर आझम सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरुन पायउतार

या निर्णयाची माहिती इमाद वसीमने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. मी बऱ्याच दिवसांपासून निवृत्ती घेण्याचा विचार करत होते. आता ती वेळ आली आहे. अलीकडच्या काळात मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल खूप विचार करत आहे. त्यानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की आता निवृत्तीची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे.

तसं पाहिला तर इमाज वसीन बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर होता. त्याने शेवटचा सामना एप्रिल महिन्यात खेळला होता. या सामन्यात त्याने 31 धावा केल्या होत्या. विश्वचषक स्पर्धेसाठी निवड समितीने त्याचा विचार केला नव्हता. संघाबाहेरच राहिल्याने भविष्यात संधी मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. त्यानंतर वसीमने निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे. इमाद वसीमने पाकिस्तानसाठी एकूण 55 एकदिवसीय आणि 66 टी 20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर पाच अर्धशतके आहेत. मात्र त्याला एकही शतक करता आले नाही. गोलंदाजीत त्याने एकदिवसीय सामन्यात 44 तर टी 20 सामन्यात 65 विकेट्स घेतल्या आहेत.

विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर बांग्लादेशला मिळाला नवा कर्णधार 

दरम्यान, पाकिस्तान संघाने या विश्वचषकात नऊपैकी फक्त चार सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर गडगडला होता. खुद्द बाबरलाही फलंदाजीत फारशी कमाल दाखवता आली नव्हती. त्यानंतर बाबरवर चहुबाजूंनी टीका होत होती. अखेर बाबर आझमनेही  कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. बाबरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. प्रथमच कर्णधारपद मिळाल्याच्या क्षणाची आठवण करून देत तो म्हणाला की, आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडत आहे. मात्र, आपण तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube