विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर बांग्लादेशला मिळाला नवा कर्णधार

विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर बांग्लादेशला मिळाला नवा कर्णधार

World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकातील (World Cup 2023) लाजिरवाण्या कामगिरीनंतर बांग्लादेश क्रिकेटमध्येही बदलाचा काळ सुरू झाला आहे. शनिवारी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) नजमुल हुसेन शांटो (Najmul Hussain Shanto) याची संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, सध्या लिटन दासच्या (Liton Das) अनुपस्थितीत त्याच्याकडे हे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. लिटन दासला विश्वचषकानंतर एका महिन्याची विश्रांती देण्यात आली आहे.

लिटन दासने मागितली रजा
मिळालेल्या माहितीनुसार, नजमुल हुसैन शांटो न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्या नियुक्तीची घोषणा करताना बोर्डाचे प्रमुख जलाल युनूस म्हणाले, लिटन दास याने एक महिन्याची रजा मागितली आहे. तो दोन कसोटी खेळणार नाही. त्याला हा महिना खासकरून त्याच्या कुटुंबासोबत घालवायचा आहे.

IND vs AUS Final : महामुकाबल्यापूर्वी दोन्ही टीमसाठी रिव्हर क्रूझ डिनर, असा आहे स्पेशल मेनू

यापूर्वी शांटोने वनडे संघाचे नेतृत्व केले
शांटो हा वनडे वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशचा उपकर्णधार होता. शाकिब अल हसनच्या अनुपस्थितीतही त्याने संघाचे नेतृत्व केले. शाकिब आणि लिटन यांच्या अनुपस्थितीत सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेतही त्याने बांग्लादेशचे नेतृत्व केले होते. त्या मालिकेत न्यूझीलंडने बांग्लादेशचा 2-0 असा पराभव केला होता. न्यूझीलंडने बांग्लादेशमध्ये 15 वर्षांनंतर वनडे मालिका जिंकली होती.

World Cup Final : फायनल मॅच तुम्ही विसरणारच नाही; गुजरात सरकारचं सुपरडुपर प्लॅनिंग!

28 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार
एकदिवसीय मालिकेनंतर विश्वचषक सुरू झाला होता. विश्वचषकानंतर बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 28 नोव्हेंबरपासून सिलहटमध्ये तर दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जाईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube