पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये भूकंप; बाबर आझम सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरुन पायउतार

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये भूकंप; बाबर आझम सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरुन पायउतार

कराची : एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघात सुरु झालेले राजीनामा सत्र अद्याप सुरुच आहे. आता बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. (Babar Azam has resigned as the captain of all three formats of the Pakistan cricket team)

पाकिस्तान संघाने या विश्वचषकात नऊपैकी फक्त चार सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर गडगडला होता. खुद्द बाबरलाही फलंदाजीत फारशी कमाल दाखवता आली नव्हती. त्यानंतर बाबरवर चहुबाजूंनी टीका होत होती. अखेर आता त्याने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

शतकांचा ‘विराट’ बादशाह; किंग कोहलीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला वानखेडेवरच टाकले मागे

बाबरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. प्रथमच कर्णधारपद मिळाल्याच्या क्षणाची आठवण करून देत तो म्हणाला की, आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडत आहे. मात्र, आपण तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

बाबरने सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिले?

बाबरने X वरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘मला तो क्षण चांगला आठवतो जेव्हा मला पीसीबीकडून 2019 मध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करण्यासाठी कॉल आला होता. गेल्या चार वर्षांत मी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण माझ्या मनापासून आणि पूर्ण समर्पणाने मी क्रिकेट जगतात पाकिस्तानचा अभिमान कायम ठेवण्याचे ध्येय ठेवले.

‘पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये नंबर-1 स्थानावर पोहोचणे हा खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम होता. या प्रवासात पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या अतुट पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो’, असेही तो म्हणाला.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्यात घातपाताच्या धमकीने खळबळ; बंदोबस्तात वाढ

बाबर म्हणाला, ‘आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटते की हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहीन. नवीन कर्णधार आणि संघाला माझा पूर्ण पाठिंबा असेल. मला ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही आभारी आहे.

इम्राननंतर बाबर हा दुसरा यशस्वी कर्णधार :

बाबर आझमने आतापर्यंत 134 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत 78 सामने जिंकले आहेत, तर 44 सामने हरले आहेत. 1992 च्या विश्वचषक विजेत्या इम्रान खाननंतर बाबर हा दुसरा सर्वात यशस्वी पाकिस्तानी कर्णधार आहे.

बाबर आझमचा कर्णधारपदाचा विक्रम

कसोटी सामने : 20
जिंकले: १०
पराभूत: 6
ड्रॉ: 4

एकदिवसीय सामने : ४३
जिंकले: 26
पराभूत: 15
टाय: 1
अनिर्णीत: 1

T20 आंतरराष्ट्रीय सामने : 71
जिंकले: 42
पराभूत: 23
अनिर्णीत : 6

बाबरच्या आधीही दोन राजीनामे :

वर्ल्ड कपमधील लाजिरवाण्या कामगिरीमुळे यापूर्वी मुख्य निवडकर्ते इंझमाम उल हक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावर हितसंबंधांचाही आरोप आहे. पाकिस्तानचा संघ शेवटचा सामना खेळून मायदेशी परतला तेव्हा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ आता बाबरनेही कर्णधारपद सोडले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube