IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्यात घातपाताच्या धमकीने खळबळ; बंदोबस्तात वाढ

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्यात घातपाताच्या धमकीने खळबळ; बंदोबस्तात वाढ

IND vs NZ : विश्वचषकात आता सेमी फायनला (World Cup 2023) थरार सुरू होत आहे. आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईत सामना होणार आहे. या सामन्याची तयारी सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर (Mumbai Police) आलेल्या धमकीने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या ट्विटरवर अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांकडून बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या ट्विटरला टॅग करत एका फोटोत गन, हँड ग्रेनेड आणि काडतूस असलेले चित्र पोस्ट केले आहे. तसेच सामन्यादरम्यान आग लगा देंगे अशा आशयाचे चित्र पोस्ट केले होते. या धमकीने खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

World Cup 2023 : सामन्याआधीच टीम इंडियाचं वाढलं टेन्शन; न्यूझीलंडपासून भारताला ‘हा’ धोका

विश्वचषकात आता सेमी फायनलचा थरार (World Cup 2023) सुरू झाला आहे. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत भारताचा संघ अजूनही अपराजित राहिलेला आहे. एकाही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. आता सेमी फायनलचा पहिला सामना दोन बलाढ्य संघात होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसत असले तरी टेन्शनही आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरोधात न्यूझीलँडच्या संघाने नेहमीच सरस कामगिरी केली आहे. दोन्ही संघांत विश्वचषकात आतापर्यंत दहा सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलँडने 5 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने चार सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. मागील 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलँडचा पराभव करत टीम इंडियाचा (Team India) विजयी रथ रोखला होता.

टीम इंडियाच्या फलंदाजांनी 2300 हून अधिक धावा केल्या

टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली.एका शतकासोबत त्याने 503 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने 270 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विराट कोहलीने दोन शतकांसह 594 धावा केल्या आहेत. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. श्रेयस अय्यरने एका शतकासह 421 धावा केल्या आहेत. नेदरलँडविरुद्ध अय्यरची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणूनही निवड करण्यात आली.

World Cup 2023 : रोहित, गिल, कोहलीच्या फटकेबाजीनंतर अय्यर, केएलचा तुफानी शतकांचा धमाका !

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube