World Cup 2023 : रोहित, गिल, कोहलीच्या फटकेबाजीनंतर अय्यर, केएलचा तुफानी शतकांचा धमका !

  • Written By: Published:
World Cup 2023 : रोहित, गिल, कोहलीच्या फटकेबाजीनंतर अय्यर, केएलचा तुफानी शतकांचा धमका !

India VS Netherlands- बेंगळुरू: वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) नेदरलँड्स (Netherlands) विरुद्धच्या सामन्यात भारतीय (India) फलंदाजांनी चौकार,षटकारांची आतिषबाजी केली. सलामीवीर शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहलींच्या अर्धशतकीय खेळीनंतर बेंगळुरूमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची तुफान आले. दोघांनी चौकार, षटकारांचा पाऊस पाडत शानदार शतके झळकविली आहेत. भारताने चार विकेट्सच्या मोबदल्यास 410 धावांचा डोंगर उभा केला.ही वर्ल्डकपमधील पाचवी मोठी धावसंख्या आहे. अय्यरने 94 चेंडूत 128 धावांची नाबाद खेळी केली. त्याने दहा चौकार आणि पाच षटकार मारले. त्याचे वर्ल्डकपमधील पहिले शतक आहे.तर केएल राहुलनेही 64 चेंडूत 102 धावा कुटल्या. त्याने 11 चौकार आणि चार षटकार मारले.


रजनीकांतचा मोठा धमाका! बहुप्रतिक्षित लाल सलामचा टीझर रिलीज, अॅक्शन अवताराने वेधलं चाहत्यांचं लक्ष

श्रेयसने अवघ्या 84 चेंडूत शतक झळकविले आहे. चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला येऊन शतक झळकविणे हा एक विक्रम आहे. युवराज सिंगने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकविले होते. तर अय्यर हा 2015 नंतर वर्ल्डकपमध्ये मधल्या फळीत खेळताना शतक झळकविणाऱ्या पहिल्या फलंजदाज ठरला आहे. 2015 मध्ये सुरेश रैनाने शतक ठोकले होते.

World Cup 2023 : सेमीफायनलसाठी दोन नवीन नियम; सामना रद्द झालाी तरी निकाल लागणार
नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्माने 54 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्यात त्याने आठ चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचबरोबर त्याने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचे विक्रमही नोंदविले आहेत. रोहित आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटृसाठी शतकीय भागिदारी केली. शुभमन गिलने 32 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यात त्याने 5 चौकार आणि चार षटकार मारले.कोहलीने 56 चेंडूत 51 धावा केल्या. भारताचे तीन फलंदाज दोनशे धावांवर बाद झाले होते.

MLA Disqualification : आमदार अपात्र होणार? नार्वेकरांच्या उत्तराने वाढला ‘सस्पेन्स’

त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांना फोडून काढले.त्यात दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत जोरदार शतके झळकवत धावसंख्या चारशेपार नेली. या जोडीने शेवटच्या दहा षटकांमध्ये सव्वाशे धावा काढल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube