World Cup 2023 : सामन्याआधीच टीम इंडियाचं वाढलं टेन्शन; न्यूझीलंडपासून भारताला ‘हा’ धोका
World Cup 2023 : विश्वचषकात आता सेमी फायनलचा थरार (World Cup 2023) सुरू झाला आहे. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत भारताचा संघ अजूनही अपराजित राहिलेला आहे. एकाही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. आता सेमी फायनलचा पहिला सामना दोन बलाढ्य संघात होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसत असले तरी टेन्शनही आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरोधात न्यूझीलँडच्या संघाने नेहमीच सरस कामगिरी केली आहे. दोन्ही संघांत विश्वचषकात आतापर्यंत दहा सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलँडने 5 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने चार सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. मागील 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलँडचा पराभव करत टीम इंडियाचा (Team India) विजयी रथ रोखला होता.
world cup 2023 : रोहितने केली चाहत्यांची इच्छा पूर्ण; विराटने घेतली नऊ वर्षानंतर नववी विकेट
इतकेच नाही तर टी 20 विश्वचषकातही न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही न्यूझीलंडने भारताचा पराभव करत विजेतपद पटकावले होते. आता विश्वचषकात भारताचा संघ दुसऱ्यांदा न्यूझीलंड विरोधात उभा ठाकला आहे. साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यानंतर आता सेमी फायनलच्या टप्प्यात पुन्हा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. आता या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2023 च्या वनडे विश्वचषक (World Cup) स्पर्धेतील भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास खूप नेत्रदीपक राहिला आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली आहे. लीग टप्प्यातील भारत हा एकमेव संघ ठरलायं ज्याने एकही सामना गमावला नाही. गुणतालिकेतही भारताने अव्वल स्थान पटकावले. आता भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी अवघ्या दोन पावलांवर आहे. भारताचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. भारताला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन व्हायचं असेल तर इतिहास बदलावा लागणार आहे.
world cup 2023 : रोहितने केली चाहत्यांची इच्छा पूर्ण; विराटने घेतली नऊ वर्षानंतर नववी विकेट
टीम इंडियाच्या फलंदाजांनी 2300 हून अधिक धावा केल्या
टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली.एका शतकासोबत त्याने 503 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने 270 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विराट कोहलीने दोन शतकांसह 594 धावा केल्या आहेत. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. श्रेयस अय्यरने एका शतकासह 421 धावा केल्या आहेत. नेदरलँडविरुद्ध अय्यरची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणूनही निवड करण्यात आली.