world cup 2023 : रोहितने केली चाहत्यांची इच्छा पूर्ण; विराटने घेतली नऊ वर्षानंतर नववी विकेट

world cup 2023 : रोहितने केली चाहत्यांची इच्छा पूर्ण; विराटने घेतली नऊ वर्षानंतर नववी विकेट

Virat Kohli : विराट कोहली विश्वचषकाच्या शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजी करताना दिसला. चाहत्यांची मागणी पूर्ण करत रोहित शर्माने चेंडू कोहलीच्या हातात दिला. यापूर्वी स्टँडवर बसलेले चाहते कोहलीला गोलंदाजी करण्याची विनंती करत होते. रोहित शर्माच्या विश्वासाला पात्र ठरत कोहलीने दुसऱ्याच षटकात विकेट घेतली. कोहलीने 9 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेतली.

कोहलीच्या विकेटवर पत्नी अनुष्का शर्माने जल्लोश केला. तिने केलेल्या जल्लोशाचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोहलीची विकेट घेताच अनुष्का शर्माला हसू आवरता आले नाही. आपल्या दुसऱ्या आणि डावाच्या 25व्या षटकात कोहलीने नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसला बाद केले. यावेळी मॅच पाहण्यासाठी अनुष्का स्टँडवर हजर होती. अनुष्का शर्माने मोठा जल्लोश केला.

World Cup : 32 वर्षांपूर्वी जिथे मिळाली नवसंजीवनी तिथेच ऐतिहासिक संधी : आफ्रिकेकडे जगाचे लक्ष

विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील ही पाचवी विकेट होती. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-20मध्येही त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच कोहलीची ही एकूण 9वी आंतरराष्ट्रीय विकेट होती. कोहलीने 9 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेतली. यापूर्वी 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ब्रेंडन मॅक्युलमला बाद केले होते. या स्पर्धेच्या आधी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने हार्दिक पांड्याच्या षटकातील उरलेले तीन चेंडू टाकले होते, त्यानंतर चाहते कोहलीला गोलंदाजी करण्याची मागणी सातत्याने करत होते. आज रोहित शर्माने चाहत्यांची मागणी पूर्ण करत कोहलीला गोलंदाजी केली.

World Cup 2023 : रोहित, गिल, कोहलीच्या फटकेबाजीनंतर अय्यर, केएलचा तुफानी शतकांचा धमका !

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

अर्धशतक झळकावत फलंदाजीत चमत्कार घडवला
प्रथम फलंदाजी करताना कोहलीने अर्धशतक झळकावले. कोहलीच्या बॅटमधून 56 चेंडूत 51 धावा आल्या, ज्यात 5 चौकार आणि 1 षटकार आहे. किंग कोहलीकडून चाहत्यांना 50 व्या वनडे शतकाची अपेक्षा होती, जी तो पूर्ण करू शकला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube