World Cup : 32 वर्षांपूर्वी जिथे मिळाली नवसंजीवनी तिथेच ऐतिहासिक संधी : आफ्रिकेकडे जगाचे लक्ष

World Cup : 32 वर्षांपूर्वी जिथे मिळाली नवसंजीवनी तिथेच ऐतिहासिक संधी : आफ्रिकेकडे जगाचे लक्ष

पुणे : यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शानदार कामगिरी करत आफ्रिकेच्या टीमने यंदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली असून त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. (wonderful coincidence of the South African team with the Eden Gardens Stadium in World Cup 2023)

यासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत या विश्वचषकात एक अद्भुत योगायोगही समोर आला आहे. आहे. हा योगायोग त्यांना चॅम्पियनही बनवण्याचीही शक्यता आहे. कारण दक्षिण आफ्रिकेच्या कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानाशी संबंधित खूप खास आठवणी आहेत. शिवाय नोव्हेंबर हा महिनाही आफ्रिकन संघासाठी खूप खास दिवस आहे. 32 वर्षांपूर्वी याच महिन्यात आणि याच स्टेडियममधून दक्षिण आफ्रिका संघाचा क्रिकेटच्या इतिहासातील नवीन प्रवास सुरु झाला होता.

काय घडलं होतं 32 वर्षांपूर्वी?

32 वर्षांपूर्वी ईडन गार्डन स्टेडियमवर नोव्हेंबर हा जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील एक अतिशय भावनिक महिना ठरला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 21 वर्षे जागतिक क्रिकेटपासून वेगळे ठेवण्यात आले. वर्णद्वेषाच्या धोरणामुळे जगाने दक्षिण आफ्रिकेपासून अंतर ठेवले होते. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ 1991 मध्ये परतला आणि याच नोव्हेंबर महिन्यात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. विशेष म्हणजे भारतीय भूमीवरच आफ्रिकन संघाला हे ‘नवे जीवन’ मिळाले होते.

भारत-न्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेत सेमीफायनलचे युद्ध : फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) सामील झाल्यानंतर 4 महिन्यांतच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. पुनरागमनानंतर हा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा सामना भारताने 3 विकेटने जिंकला असला तरी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डने पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली होती. त्या सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या डोनाल्डला आणि 62 धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना एकत्रितपणे संयुक्तपणे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडले होते.

‘म्हणून’ आफ्रिकन संघावर बंदी घालण्यात आली होती :

दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने काही नियम बनवले होते. हे नियम ऐकून संपूर्ण जगच बुचकाळ्यात पडले होते. सरकारच्या नियमांनुसार, आफ्रिकन संघाला फक्त गोऱ्या देशांविरुद्ध (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड) खेळण्याची परवानगी होती. विरोधी संघातही केवळ पांढरे खेळाडूच खेळतील, अशीही अट होती.

World Cup 2023 : सेमीफायनलसाठी दोन नवीन नियम; सामना रद्द झालाी तरी निकाल लागणार

या कारणास्तव आयसीसीने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला निलंबित केले,यामुळे आफ्रिकन खेळाडूंचे भविष्य धोक्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करेल याची प्रतीक्षा करत तेथील अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द संपली. अखेर 21 वर्षांनंतर तो दिवस आला जेव्हा दक्षिण आफ्रिकेने वर्णभेदाचे धोरण संपुष्टात आणले.

अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेसाठी नोव्हेंबर हा महिना खूप खास आहे. तसेच, यावेळी या संघाला उपांत्य सामना त्याच मैदानावर खेळायचे आहे, जिथे नवसंजीवनी मिळाली होती. मात्र, उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलियाचे आव्हान सोपे असणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube