भारत-न्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेत सेमीफायनलचे युद्ध : फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?
पुणे : भारतात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत आता साखळी संपून उपांत्य सामने सुरु होत आहेत. स्पर्धेतील टॉप-4 संघांनी सेमीफायनलमध्ये अधिकृतप्रवेश केला आहे. भारत (India), दक्षिण आफ्रिका (South Africa), ऑस्ट्रेलिया (Australia)आणि न्यूझीलंड (New Zealand) हे सेमीफायनलमधील बलाढ्य संघ आहेत.पाकिस्तान देखील उपांत्य फेरीच्या शर्यतीत होता, परंतु शनिवारी (11 नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला सुरुवात पाकिस्तानचा संघ बाहेर पडला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आता थेट मायदेशी परतणार आहे. (India, South Africa, Australia and New Zealand entered the semi-finals of the World Cup)
मुंबईत भिडणार भारत आणि न्यूझीलंड :
या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतापुढे आता चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. 2019 मधील विश्वचषकामध्येही भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगला होता. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर आता भारताकडे मागील उपांत्य फेरीचा बदला घेण्याची मोठी संधी असणार आहे. यावेळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
World Cup 2023: क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या ‘अफगाण’चा अखेरच्या सामन्यातही झुंजारपणा !
कोलकातामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना कांगारूंशी होणार :
यानंतर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे. तर आफ्रिकेला कायमच रिकाम्या हाती मायदेशी परतावे लागले आहे. आफ्रिका संघाने यापूर्वी अनेक वेळा चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पण मोक्याच्या क्षणी कच खाल्याने आफ्रिका बाहेर पडत आली आहे. मात्र यावेळी टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिले विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे.
विश्वचषकातील उपांत्य फेरीचे सामने :
पहिला उपांत्य सामना :
भारत विरुद्ध न्यूझीलंड – मुंबई (वानखेडे स्टेडियम) – 15 नोव्हेंबर
दुसरा उपांत्य सामना :
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया – कोलकाता (ईडन गार्डन) – 15 नोव्हेंबर
World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार!
विश्वचषकातील चार उपांत्य फेरीतील खेळाडूंचे संघ:
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर .
न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार/विकेटकीपर), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.
ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क .
दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, रबरेझ शम्सी, रबाडा डसेन, लिझाड विलियम्स.