World Cup 2023: क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या ‘अफगाण’चा अखेरच्या सामन्यातही झुंजारपणा !

  • Written By: Published:
World Cup 2023: क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या ‘अफगाण’चा अखेरच्या सामन्यातही झुंजारपणा !

SA vs AFG : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) बलाढ्य संघाला पराभवाचा झटका देणाऱ्या अफगाणिस्तान शेवटच्या मॅचमध्ये पराभूत झाला आहे. या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa ) शेवटच्या सामन्यातही अफगाणच्या (Afganisthan) खेळाडूंनी झुंजारपणा दाखवून दिला आहे.

‘आमच्या उमेदवारासमोर तीन भाजपचे उमेदवार’; मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

अफगाणिस्तानने नऊ सामन्यामध्ये चार सामने जिंकले आहेत. पाँइट टेबलमध्ये अफगाण आठ पाँइटसह सहाव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या अफगाणिस्तानने 244 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 48 व्या षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात सामनाही जिंकला आहे.

World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार!

दक्षिण आफ्रिका संघ यापूर्वीच उपांत्यफेरीत दाखल झाला आहे. पण मागील सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडविला होता. परंतु आफ्रिकेने आजचा सामना जिंकून आपली गडी रुळावर आणली आहे.

World Cup 2023 : मॅक्सवेल तिसरा ! ‘या’ दोन फलंदाजांचं रेकॉर्ड तुटलंच नाही

अफगाणिस्तानकडून अजमतुल्लाह ओमरजईने शानदार फलंदाजी केली. त्याने 97 धावांची खेळी केली. रहमत शाह आणि न्यूर अहमदने यांनी प्रत्येकी 26 धावा केल्या. तर रहमनुल्लाह गुरबाजने 25 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्जी याने चार विकेट झटकाविल्या. तर लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळविल्या.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेकडून डुसेनने 76 धावांची नाबाद खेळी केली. तर सलामीवीर क्विंटन डिकॉकने 41 धावांची खेळी केली. अफगाणकडून मोहम्मद नबी आणि राशिद खानने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत.

ओमरजईची खेळी व्यर्थ
अष्टपैलू अजमतुल्लाह ओमरजईने नाबाद 97 धावांची खेळी केली. ओमरजईने 107 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकार मारले. परंतु एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे पहिले शतक हुकले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube