World Cup 2023 : मॅक्सवेल तिसरा ! ‘या’ दोन फलंदाजांचं रेकॉर्ड तुटलंच नाही

World Cup 2023 : मॅक्सवेल तिसरा ! ‘या’ दोन फलंदाजांचं रेकॉर्ड तुटलंच नाही

World Cup 2023 :  ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून (World Cup 2023) इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने  (Glenn Maxwell) सर्वात मोठी खेळी केली आणि हरलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. एकावेळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 91 धावांत सात विकेट (AUS vs AFG) गमावल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते परंतु, ग्लेन मॅक्सवेलने 201 धावांची झंझावात खेळी करत आपल्या संघाला हरलेला सामना जिंकून दिला. मॅक्सवेलने 21 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस पाडला. एक पाय जखमी असतानाही त्याने ही कामगिरी करून दाखवली. या विजयासह मॅक्सवेलने अनेक विक्रमांना गवसणी घातली. भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील मोठा विक्रमही मोडीत काढला.

या सामन्यात मॅक्सवेलने 128 चेंडूत 201 धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेत द्विशतक करणारा तो जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. याआधी न्यूझीलँडचा मार्टिन गुप्टिल आणि वेस्टइंडिजचा ख्रिस गेल या दोन फलंदाजांच्या नावावर हा विक्रम आहे. त्यानंतर मॅक्सवेल हा तिसरा फलंदाज बनला आहे. विश्वकपमधील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रन गुप्टिलच्या नावावर आहे.

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच बांग्लादेशकडून लंकेची शिकार ! तीन विकेट्सने केला पराभव

वेस्टइंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेल हा वर्ल्डकप स्पर्धेत द्विशतक करणारा पहिला खेळाडू आहे. त्याने 2015 मधील विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध त्याने द्विशतक केले होते. या सामन्यात त्याने 215 रन एकट्याने केले होते. तर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने वेस्टइंडिद विरुद्धच्या सामन्यात द्विशतक केले होते. गप्टिलने 163 चेंडूत 24 चौकार आणि 11 षटकार ठोकत 237 धावा केल्या होत्या. या दोन्ही फलंदाजांच्या धावांचा विक्रम मॅक्सवेलला मोडता आला नसला तरी खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ही कामगिरी केली त्यामुळे त्याची खेळी या दोन्ही फलंदाजांपेक्षा जास्त महत्वाची ठरते.

202 धावांच्या भागीदारीत पॅट कमिन्सच्या 12 धावा

अफगाणिस्तान संघाला एकटा ग्लेन मॅक्सवेल नडला. मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांच्यात 202 धावांची भागीदारी झाली होती, पण पॅट कमिन्सचे योगदान केवळ 12 धावांचे होते. अशा प्रकारे ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीचा अंदाज लावता येईल. पॅट कमिन्स 68 चेंडूत 12 धावा करून नाबाद परतला, पण ग्लेन मॅक्सवेलने उर्वरित काम पूर्ण केले. तत्पूर्वी, 91 धावांत 7 विकेट्स गमावून ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर होता, पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांकडे ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीला उत्तर नव्हते.

विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पहिले शतक, ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर

292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या षटकात ट्रॅव्हिस हेडच्या (0) रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. यानंतर सहाव्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मिचेल मार्शने 11 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. संघ दुसऱ्या विकेटच्या धक्क्यातून सावरत असताना 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 18 धावांवर अझमतुल्ला ओमरझाईचा बळी ठरला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube