Rohit Sharma : रोहितच्या कॅप्टसीची घोषणा 5:45 च्या मुहूर्तावर का? खास आहे कारण…
Rohit Sharma मुंबई इंडियन्सने अनुभवी फलंदाज आणि पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
Why MI Announced Rohit Sharm Captancy On 5.45 PM : आयपीएलच्या आगामी 2027 हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अनुभवी फलंदाज आणि पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या तीन हंगामांपासून संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याची जागा आता रोहित शर्मा घेणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. 2027 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पण, रोहितच्या कॅप्टसीची घोषणा 5:45 च्या मुहूर्तावर का करण्यात आली याची चर्चा आता रंगली आहे नेमकं हा मुहूर्तामागे काय खास कारण आहे ते जाणून घेऊया…
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा पाच हंगामांत आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पाच विजेतेपदे जिंकणारा कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. 2011 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल्यापासून रोहितने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने केवळ विजेतेपदेच मिळवली नाहीत, तर संघात विजयाची संस्कृतीही निर्माण केली.
2024 च्या आयपीएल हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले होते. गुजरात टायटन्समधून मुंबईत परतलेल्या हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. आता आगामी हंगामासाठी संघ व्यवस्थापनाने पुन्हा रोहितवर विश्वास दाखव लाआहे.
Smile, everybody smile 💙
#MumbaiIndians #CaptainRo https://t.co/YUqYZTQxu9
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2026
संध्याकाळी 5:45 वाजताच घोषणा का केली?
रोहित शर्माला कर्णधार घोषित करण्यासाठी मुंबई इंडियन्सने निवडलेली वेळही विशेष चर्चेत आहे. 27 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी नेमके 5 वाजून 45 मिनिटांनी फ्रँचायझीने ही घोषणा केली. यामागे रोहित शर्माचे खास कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. रोहितने मुंबईला पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली आहेत आणि त्याच्या जर्सीचा क्रमांक 45 आहे. या दोन्ही आकड्यांची सांगड घालत 5:45 ही वेळ निवडण्यात आली असावी असा अंदाज आता वर्तवला जात आहे.
मुंबईच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे नेतृत्व, युवा खेळाडूंना संधी देण्याची वृत्ती आणि संघातील खेळाडूंशी असलेले नाते यामुळे त्याने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता तीन हंगामांनंतर पुन्हा एकदा रोहितच्या हातात संघाची धुरा आल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 2027 च्या हंगामात रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स सहाव्यांदा विजेतेपद पटकावणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.