World Cup Final : ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरवर गावसकर भडकले; नेमकं काय घडलं ?

World Cup Final : ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरवर गावसकर भडकले; नेमकं काय घडलं ?

World Cup Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. सामना गमावल्याचे दुःख खेळाडूंच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते. यानंतर भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) ऑस्ट्रेलियाच्या विकेटकिपरच्या एका कृतीवर चांगलेच भडकल्याचे दिसून आले. विकेटकीपर जोस इंग्लिस वारंवार स्टंपिंगचे अपील करत होता. त्याच्या या कृत्यावर गावसकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरने सामन्या दरम्यान अपील केले.  त्यावर ही अपील का करण्यात आली, असा प्रश्न गावसकर यांनी उपस्थित केला. स्क्वेअर लेगच्या पंचांकडे अपील करण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पूर्ण बॉल चेक करायला लावत आहात. जेव्हा केएल राहुल फलंदाजी करत होता. तेव्हा एक चेंडू विकेटकीपर इंग्लिसकडे गेला होता. तेव्हा त्याने स्टंपवरील बेल्स उडवत अपील केले होते. पंचांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे दिला. यानंतरही त्याने पुन्हा अपील केली होती. गावसकर यांनी त्याच्या या अपीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

IND vs AUS Final : बदली खेळाडू म्हणून आला पण, जिगरबाज ठरला; लाबुशेनची शानदार खेळी

रोहित शर्माला अश्रू अनावर..

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. सामना गमावल्याचे दुःख खेळाडूंच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते. कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अश्रू अनावर झाले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा भावनिक झाल्याचं दिसून आलं. स्पर्धेतील सगळ्या सामन्यात भारताने जबरदस्त खेळ करत विजय मिळवला. अंतिम सामन्यात मात्र तशी कामगिरी करता आली नाही. निराशाजनक कामगिरीचे फळ पराभवाच्या रुपात मिळाले.

हेड-लाबुशेन ठरले विजयाचे शिल्पकार 

भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS Final) सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताकडून बुमराहने 2 विकेट घेतल्या. तर शमी आणि सिराजने 1 विकेट घेतली. इतर गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नाही. अंतिम सामन्यात एकही भारतीय गोलंदाज प्रभावी दिसला नाही. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण नंतर दोघेही निष्प्रभ दिसले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube