World Cup 1987 : एक्स्ट्रा पास नाकारले अन् मराठी माणसाने वर्ल्डकपची स्पर्धाच भारतात आणली!

World Cup 1987 : एक्स्ट्रा पास नाकारले अन् मराठी माणसाने वर्ल्डकपची स्पर्धाच भारतात आणली!

कपिल देवच्या नेतृत्वात भारताने 1983 चा वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण होते. राष्ट्रपतींपासून प्रत्येक सामान्य माणूस आनंदी होता. पण एक माणूस काहीसा दुःखी होता. रागात होता. त्याला बदला घ्यायचा होता. त्याला बदला घ्यायचा होता त्या नकाराचा आणि त्या नाकारामागे दडलेल्या गोऱ्या राष्ट्रांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचा. तो भारतात (India) आला आणि कामाला लागला. पुढच्या तीन वर्षात या माणसाने वर्ल्डकपच्या आख्ख्या स्पर्धेचे आयोजन भारतात (India) करुन दाखविले. (In 1987 N.K. P. Salve successfully organized the World Cup in India.)

या माणसाचे नाव होते, ए. के. पी. साळवे.

आज भारतात वर्ल्डकपची स्पर्धा होत आहे. मोठी मैदाने, प्रेक्षकांची मिळारी दाद, पाण्यासारखा पैसा, खेळाडूंना मिळालेले ग्लॅमर असे सगळे चित्र आजच्या काळात दिसते. 2011 च्या वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजनही भारतात झाले होते. तेव्हाही काहीशी अशीच परिस्थिती होती. पण साळवे यांनी जी वर्ल्डकपची स्पर्धा यशस्वी आयोजित करुन दाखविली होती तो काळ होता 1990 च्या दशकातील. 1987 मध्ये भारतात पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा, क्रिकेटला नसलेले ग्लॅमर, पैशांची कमतरता अशा परिस्थितीत देखील ही स्पर्धा यशस्वी झाली आणि पहिल्यांदाच इंग्लिश किनाऱ्यांच्या बाहेरही यशस्वी स्पर्धा होऊ शकते हे भारताने दाखवून दिले.यामागे एन. के. पी. साळले यांचे सर्वात मोठे योगदान होते.

IND vs AUS Final : विश्वचषकाची फायनल, रोहित शर्माने केला एक खास विक्रम

एन. के. पी. साळवे म्हणजे भारतातील बडे राजकारणी. नरेंद्रकुमार प्रसादराव साळवे असे लांबलचक मूळ नाव असलेले नंतरच्या काळात ‘एन.के.पी.’ अशा सुटसुटीत नावाने क्रीडा, साहित्य, संगीत आणि भारतीय राजकारणात प्रसिद्ध झाले. वाणिज्य विषयातील पदवी नंतर प्रथितयश सीए म्हणून त्यांनी नाव कमावले. त्यानंतरच्या काळात ते काँग्रेससोबत जोडले गेले आणि इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीयही बनले. राजकारणी म्हणून ते लोकसभेचे दोनवेळा सदस्य, 1978 ते 2003 असे तब्बल 26 वर्ष ते राज्यसभेचे सदस्य होते. याच काळात ते 1980 मध्ये केंद्रीय मंत्रीही होते, शिवाय बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षही होते.

काय घडलं होतं 1983 च्या वर्ल्डकपवेळी?

ज्यावेळी वर्ल्डकप स्पर्धा सुरू होती तेव्हा, भारताचे क्रेंदीय शिक्षण मंत्री सिद्धार्थ शंकर रे इंग्लंड दौऱ्यावर गेलेले होते. त्याच दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज अशी फायनल मॅच होणार होती. सिद्धार्थ शंकर रे क्रिकेटचे चाहते आणि खेळाडूही होते. विद्यार्थीदशेत त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या पत्नी, वकील आणि खासदार श्रीमती माया रे, 1975-77 च्या आणीबाणीच्या काळात लोकसभेत साळवे यांच्या सहकारी आणि जवळच्या मैत्रिणी होत्या. आपल्या बहिणीच्या घरी असलेल्या साळवे यांना रे यांनी संपर्क साधला आणि फायनल मॅचचे पास आहेत का अशी विचारणा केली.

त्यावेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआय अध्यक्ष म्हणून फायनल सामन्याचे साळवे आणि त्यांच्या पत्नी यांना पास दिले होते. साळवे यांना त्यांची बहिण निर्मला श्रीवास्तव आणि त्यांचे पती, उद्योगपती सीपी श्रीवास्तव यांच्यासाठीही पास हवे होते. त्यांनी बीसीसीआयचे तत्कालिन सचिव अनंत वागेश कानमाडीकर यांना पास किंवा विकत तिकीटांची विचारणा करण्यासाठी मेलबर्न क्रिकेट क्लबकडे पाठविले. कानमाडीकर मोकळ्या हाताने परतले आणि तिथे घडलेला प्रसंग सांगितला.
एमसीसीने कामनाडीकर यांना अतिरिक्त पास किंवा तिकीटे देण्यास नाकार देण्यात आला. “तुम्हाला तुमच्या वाट्याचे दोन अगोदरच देण्यात आलेले आहेत. पाहिजे तर ते तुम्ही वापरू शकता. यापलिकडे एकही एक्स्ट्रा पास/ मिळणार नाही” अशा स्पष्ट भाषेत त्यांना सांगण्यात आले.

साळवे यांना या झालेल्या अपमानाच प्रचंड खेद वाटला. त्यांनी गोऱ्यांचे क्रिकेटवरील प्रभुत्व संपविण्याचे निश्चित केले.साळवे यांनी वर्ल्डकपचे आयोजन भारतीय उपखंडात करण्याचे आयोजन करण्याविषयीचा इरादा बोलून दाखविला. त्यावर त्यातील एका त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्राची प्रतिक्रिया होती तुम्ही वेडे झाला आहेत का? पण ते त्याचदिवशीपासून कामाला लागले. आत्मसन्मानाच्या भावनेने क्रिकेटच्या जगात सर्वात मोठा बदल घडवून आणण्यासाठी साळवेंच्या डोक्यात नियोजन तयार होऊ लागले.

कपिल देवचे व्हिजन, गांगुलचे अ‍ॅग्रेशन अन् धोनीचा संयम : कर्णधार म्हणजे काय रोहितने दाखवून दिले!

त्या मॅचमध्ये भारत जिंकतााच दुसऱ्या दिवशी आनंदाचा प्रसंग म्हणून निर्मला श्रीवास्तव यांनी जेवणाचे नियोजन केले.त्या पार्टीला साळवे यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एअर मार्शल नूर खान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षा गामिनी देसानायके यांना आमंत्रित केले. शिवाय आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीश डॉ. नागेंद्र सिंग, श्रीमान आणि श्रीमती एमए चिदंबरम, राज सिंग डुंगरपूर आणि लता मंगेशकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांमध्ये कालच्या मॅचबद्दल चर्चा चालू होती. त्याच चर्चेत साळवे म्हणाले, आपण हा सामना भारतातही खेळवू शकलो असतो. एखाद्या दिवशी आपणही भारतात विश्वचषक खेळू शकलो तर किती छान होईल.” त्याचवेळी एअर मार्शल नूर खान त्यांच्याकडे वळले आणि म्हणाले, “आपण पुढचा विश्वचषक आपल्या देशात का खेळू शकत नाही?”

तिथेच विश्वचषक भारतीय उपखंडात आणण्यासाठी नियोजन सुरु झाले. जगमोहन दालमिया आणि आय.एस. बिंद्रा यांना मदतीला घेत साळवे यांनी बीबीसीआयचे अध्यक्ष म्हणून आयसीसीचे अध्यक्ष क्लाइड वॉलकॉट यांची भेट घेतली आणि घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर त्यांना भारतीय उपखंडात वर्ल्डकपचे आयोजन करु इच्छितो याबाबत सांगितले. भारत आणि पाकिस्तानची एकत्रित आयोजन करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. पण त्यांच्यासमोर अनेक मुद्दे होते, जसे की राजीव गांधी आणि पाकिस्तानी हुकूमशहा झिया-उल हक यांना एकत्र आणण्याची गरज होती. इथे पाकिस्तानचे एअर मार्शल नूर खान यांची आणि साळवे यांची जवळीक कामी आली. याशिवाय उपखंडातील खेळपट्ट्यांचा दर्जा, परकीय चलनाचा अभाव, खाद्यपदार्थ आणि हॉटेल्स अशा अनेक मुद्द्यांवर साळवे आणि त्यांच्या टीमला इंग्रजांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा सामना करावा लागला.

इथे साळवे यांच्या मदतीला धावून आले धीरुभाई अंबानी. धीरुभाईंनी तो संपूर्ण वर्ल्डकप प्राजोति केला. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातील अनेकजण अंबानींवर उद्योगपती म्हणून तोफ डागत असताना धीरूभाई अंबानींनी होकार दिला होता. दोन महिने आधीच घोषणा झाली, आणि वर्ल्डकप भारत-पाकिस्तानमध्ये झाला.

1983 च्या सामन्यात ज्या सिद्धार्थ रे यांना पास मिळू शकले नव्हते त्यांच्याच पश्चिम बंगाल राज्यात अंतिम सामना खेळविला गेला. त्यावर्षीच्या वर्ल्डकपची फायनल कोलकात्याच्या मॅच ईडन-गार्डन्सवरती पार पडली. तिथेच ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. रिलायन्सने बक्षीस रक्कम म्हणून $5 दशलक्ष डॉलर्स दिले. त्यावर्षी भारत ट्रॉफी जिंकू शकला नव्हता पण अत्यंत यशस्वीपणे साळवे यांनी वर्ल्डकपचे आयोजन भारतात करुन दाखविले होते.  त्यानंतरच्या काळात आयपीएलमुळे भारताचे क्रिकेट अत्यंत श्रीमंत झाले. संपूर्ण क्रिकेट विश्वावर भारताचा दबदबा आला. पण त्याचा पाया कुठे तरी एन.के. पी साळवे यांनी रचला होता, हे विसरुन चालणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube