Video : हा सामान्य पाऊस नसून हे अतिवृष्टीचे टोक; राज्यभरातील पावसाच्या स्थितीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

Video : हा सामान्य पाऊस नसून हे अतिवृष्टीचे टोक; राज्यभरातील पावसाच्या स्थितीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

CM Fadnavis  on Mararashtra Rains : राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये 12 ते 14 लाख एकर शेती बाधीत झाले आहेत. (Rains) नांदेड जिल्ह्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर मुंबईतही रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी जनजीवण विस्कळीत झालं आहे. मात्र, आम्ही सर्व परिस्थिवर लक्ष ठेऊन आहेत असं म्हणत, राज्यभरातील पावसाच्या झालेल्या अतिवृष्टीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

सध्या मिठी नदीची पाणी पातळी धोक्याच्या पुढे गेली आहे. त्यामुळे तिथली काही लोक आपण बाजूला केली आहेत. त्याचबरोबर आता आपल्या राज्याच्या शेजारील सर्व राज्य आपल्या संपर्कात आहेत. तेलंगणा राज्याशी आपलं बोलण सुरू आहे. त्यामुळे काळजीच काही नाही अस म्हणत, मिठी नदीच्या बाबत राजकारण झाल्याचाही उल्लेख यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. तसंच, आता त्याच्या सुबक कथाही समोर येत आहेत असही ते म्हणाले.

Maharashtra Rain : राज्यात 12 ते 14 लाख एकर शेती बाधित; परिस्थिती नियंत्रणात : फडणवीस

पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले. मिठी नदी धोहीकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला 400-500 लोकांना आपल्याला हलवावं लागले. मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पातळी कमी झाली आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी आणि वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे. तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावे लागेल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

आपण राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत. काही नद्या इशारा पातळीच्या वर आहेत. आपला बाजूच्या राज्यांसोबत योग्य संपर्क आहे. पाण्याच्या विसर्गाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले जात आहे. आपल्याला फक्त हिपरगीची चिंता आहे, तिकडूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पण तो अधिक व्हावा, ही आपली मागणी आहे. तेलंगणासोबतही आपला संपर्क आहे. मात्र, काही कॅचमेंट क्षेत्रातील परिस्थिती आपल्या हातात नाही. त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुंबईतील काही भागात 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हा पाऊस अतिवृष्टीपेक्षाही जास्त आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली काय झालं, हे सगळ्यांना माहिती आहे. बंगालच्या उपसागराच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तो आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे. त्यामुळे इकडे रेड अलर्ट दिला आहे, त्याप्रमाणे मोठा पाऊस पडतो आहे. काही अडचणी निर्माण होत आहेत. शहरांमध्ये आपलं डिझाईन हे नॉर्मल प्लस 10 अशी असते. पण अतिवृष्टी झाल्यावर अडथळे येतात. त्यामुळे आपण आता दर तीन तासांनी अलर्ट देत आहोत. कुठे आणि किती पाऊस पडणार, हे लोकांना सांगत आहोत असंही ते म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube