Rain Update : मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील दोन दिवस ‘मुसळ’धार…

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

MUMBAI RAIN

Maharashtra Rain Update : राज्यातील सर्वच भागात परतीच्या पावसाने (Maharashtra Rain Update) धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालंय. मराठवाड्यासह, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने चांगलीच धुव्वाधार बॅटिंग केलींय. या पावसामु्ळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक हातून गेलंय. अशातच आता पुढील दोन दिवस मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा इशारा देण्यात आलायं.यासोबतच राज्यातील इतर भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

अहिल्यानगरकरांनो दक्षता घ्या! यलो अलर्ट जारी करत प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

मुंबईत पावसाने पुनरागमन केल्याने शहर, उपनगर, ठाण्यात धुमाकूळ घातलायं. रविवारी मध्यरात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु होती. यासोबतच वाऱ्याचाही चांगलाच जोर होता. या पावसामुळे अनेक भागांतील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईतील चाकरमान्यांना या पावसामुळे मोठी कसरत करावी लागली. रस्त्यावरच पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

दरम्यान, राजस्थानातून मोसमी पावसाने माघार घेतल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीयं. त्यामुळेच राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर परतीच्या पावसाच्या सरी दोन दिवसांपासून राज्यात बरसत आहेत.

पावसाचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाची सर्वदूर हजेरी; आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

दरम्यान, बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथे नदीपात्रा शेजारी सापते कुटुंबातील अकरा जण अडकले होते. तसेच शेरी खुर्द येथील काही जण पुरात अडकले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरची सोय करून सुरक्षित बाहेर काढले आहे. दुसरीकडे, बीड- अहिल्यानगर महामार्गावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कडा शहर परिसरातील ग्रामीण भागात नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आणि याचेच पाणी शहरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंब पाण्यात आहेत.

पूजा खेडकरच्या आईचा नवा प्रताप; चालकाचं अपहरण करुन डांबून ठेवलं…

follow us