जगातील महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस मुंबईत कोसळला ; धडकी भरविणारा रिपोर्ट कुणाचा ?

Mumbai Rain : यंदा तर परिस्थिती आणखीन बिकट ठरली. मुंबईला एका महिन्यात पडणाऱ्या पावसाएवढा पाऊस अवघ्या पाच दिवसांत कोसळला आहे.

  • Written By: Published:
Mumbai Rain

Mumbai Rain : मायानगरी, आर्थिक राजधानी अशी बिरुदे मिरविणाऱ्या मुंबईची दरवर्षी पावसाळ्यात पोलखोल होते. पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत होते. जगात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या पडणाऱ्या शहरामध्ये मुंबई आली आहे. जगात इतर शहरांपेक्षाही मुंबईत ( Mumbai Rain) जवळपास दुप्पट पाऊस पडतो.

यंदा तर परिस्थिती आणखीन बिकट ठरली. मुंबईला एका महिन्यात पडणाऱ्या पावसाएवढा पाऊस अवघ्या पाच दिवसांत कोसळला आहे. ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. मुंबईतला पाऊस हा कायमच चर्चेचा विषय असतो. यावेळीही तो चर्चेचाच विषय ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईची तुंबई होणं वगैरे नाही. कारण जशी ती दरवर्षी होते तशीच ती यावर्षीही झाली आहे. देशातल्या आणि जगातल्या प्रमुख शहरांमध्ये जो पाऊस मागच्या पाच दिवसात पडलाय. त्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आली. एकाच वेळी खूप पाऊस होणं ही धोक्याची घंटा आहे.

West Coast Weatherman ने केलेल्या एक्स पोस्ट नुसार जगातल्या प्रमुख शहरांमध्ये जेवढा पाऊस झालाय त्याच्या तिप्पट पाऊस मुंबईत पाच दिवसांत कोसळला आहे. RainTracker या एक्स अकाऊंटवरून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. मुंबईत जुलै महिन्यात 920 मिलिमिटर पाऊस कोसळला आहे. कोलकातामध्ये जुलै महिन्यात 367 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. तर चेन्नईत नोव्हेंबरमध्ये 377 मिलिमीटर पाऊस कोसळला होता.

जगातील प्रमुख महानगरांतील सर्वाधिक पावसाचा महिना आणि सरासरी पर्जन्यमान
शहर देश सर्वाधिक पावसाचा महिना महिन्यातील पर्जन्यमान
मुंबई भारत जुलै 920 मिमी
हो ची मिन्ह सिटी व्हिएतनाम सप्टेंबर 490 मिमी
मनिला फिलिपिन्स ऑगस्ट 476 मिमी
लागोस नायजेरिया जून 433 मिमी
सोल दक्षिण कोरिया जुलै 414 मिमी
ढाका बांगलादेश जुलै 391 मिमी
जकार्ता इंडोनेशिया फेब्रुवारी 381 मिमी
चेन्नई भारत नोव्हेंबर 377 मिमी
शेनझेन चीन जून 369 मिमी
कोलकाता भारत जुलै 367 मिमी
ग्वांगझोउ चीन जून 365 मिमी
क्वालालंपूर मलेशिया नोव्हेंबर 356 मिमी
बांडुंग इंडोनेशिया मार्च 343 मिमी
बँकॉक थायलंड सप्टेंबर 336 मिमी
साओ पाउलो ब्राझील जानेवारी 292 मिमी
दार एस सलाम टांझानिया एप्रिल 264 मिमी
किन्शासा काँगो नोव्हेंबर 247 मिमी
टोकियो जपान ऑगस्ट 234 मिमी
दिल्ली भारत ऑगस्ट 231 मिमी
शांघाय चीन ऑगस्ट 226 मिमी
बेंगळुरू भारत सप्टेंबर 208 मिमी
हैदराबाद भारत ऑगस्ट 204 मिमी
लाहोर पाकिस्तान जुलै 189 मिमी
ओसाका जपान जून 185 मिमी
बीजिंग चीन जुलै 170 मिमी
रिओ दि जानेरो ब्राझील जानेवारी 169 मिमी
मेक्सिको सिटी मेक्सिको ऑगस्ट 160 मिमी
लुआंडा अंगोला एप्रिल 136 मिमी
ब्युनोस आयर्स अर्जेंटिना जानेवारी 134 मिमी
इस्तंबूल तुर्की डिसेंबर 125 मिमी
न्यूयॉर्क अमेरिका जुलै 117 मिमी

follow us