नोव्हेंबर महिन्यातही पावसाचा जोर कायम; मुंबईत पुढील दोन दिवस पावसाच्या सरी…

मुंबईत पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण असून पुढील दोन दिवस पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.

Maharashtra Monsoon

Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यातही पावसाचा जोर (Rain Alert) कायम असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं. दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने त्याचाच परिणाम म्हणजे मुंबईत पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे.

कोपरगाव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडा; आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरात आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

कोंढवा गोळीबार प्रकरण ; पोलिसांची चार तासांत धडाकेबाज कारवाई आरोपींना केली अटक

काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी स्पेशल पॅकेज देखील जारी करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

follow us