कोंढवा गोळीबार प्रकरण ; पोलिसांची चार तासांत धडाकेबाज कारवाई आरोपींना केली अटक

Pune Police : पुणेतील कोंढवा येवलेवाडी भागात शनिवारी दुपारी पेट्रोल पंपाजवळ झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली.

  • Written By: Published:
Pune Police

Pune Police : पुणेतील कोंढवा येवलेवाडी भागात शनिवारी दुपारी पेट्रोल पंपाजवळ झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. रिक्षाचालक गणेश काळे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके (Pune Police) तयार करण्यात आली आणि पोलिसांनी जलदगतीने मोहीम राबवत अवघ्या चार तासांत चारही संशयितांना अटक केली. कोंढवा (Kondhwa) विभागीय गुन्हे शाखेच्या पथकातील एपीआय अफरोज पठाण, सूरज शुक्ला, विशाल मेमाणे आणि अभिजीत जाधव यांच्या पथकाने खेड शिवापूर (Khed Shivapur) परिसरातून सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

अटक केलेल्या व्यक्तींमधून दोन अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे, तर इतर दोघांची नावे अमान मेहबूब शेख (22) आणि अरबाज अहमद पटेल (24) अशी आहेत.

Today Horoscope : उत्पन्न वाढणार, ‘या’ राशींना नोव्हेंबरमध्ये होणार मोठा फायदा

आरोपींकडून दोन पिस्तुलं आणि दोन कोयते जप्त करण्यात आले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा तपास कोंढवा पोलिसांकडून सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

follow us