कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; बलात्कार करणारा ‘डिलिव्हरी बॉय’ पीडित तरूणीचा जुना मित्र?
पुण्यातील कोंढवा परिसरातील सोसायटीत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घढला होता. बलात्काराच्या या घटनेत आता नवा ट्वीस्ट आलाय.

Courier Boy Rape On Girl In Pune Kondhawa Area : पुण्यातील कोंढवा परिसरातील सोसायटीत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घढला होता. येथील 25 वर्षीय मुलीवर डिलिव्हरीच्या नावाखाली एका नराधमाने बलात्कार केला. (Kondhawa) धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचारानंतर पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि त्यात परत येईल असा मेसेज लिहिल्याचं समोर आलं. दरम्यान, या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बलात्कार करणारा नराधम पिडीत महिलेचा जुना मित्र आहे असल्याचं समोर आलंय. याबद्दल ठोस माहिती समोर आली नाही. मात्र, पोलीस त्या पातळीवर तपास करत आहेत.
काय घडलं होतं?
हा तरुण डिलिव्हरी देण्यासाठी आला तेव्हा त्याने सही करण्यासाठी म्हणून पीडित तरूणीकडे त्याचवेळी त्याने घरात प्रवेश करून दार लावून घेतल आणि तरूणीच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलें आहे. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या मोबाईलवर सेल्फी काढला आणि ‘मी परत येईल’ असा मेसेजही टाईप करून ठेवला. तसंच याबाबत कोणाला काही सांगितले तर, काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली.
पुणे हादरलं! स्प्रे मारला, बलात्कार केला अन् सेल्फी काढून डिलिव्हरी बॉयनं पुन्हा येईल सांगितलं
या घटनेनंतर साधारण रात्री साडेआठच्या सुमारास या तरुणीला शुद्ध आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने आपल्या परिचयाच्या व्यक्तींना संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर रात्री उशीरा कोंढवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 63, 77 आणि 351 (2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त (झोन ५) राजकुमार शिंदे यांनी दिली. याप्रकरणी परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीचा चेहरा कैद झाला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (बलात्काराची शिक्षा), ७७ (दृश्यवाद) आणि ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.