अमेडिया जमीन खरेदी प्रकरण; मुद्रांक दुय्यम निंबधक रवींद्र तारुला अटक
Amedia land deal case: या प्रकरणी आता जमीन खरेदी खत व्यवहार करणाऱ्या दुय्यम निबंधक रवींद्र तारु (Ravindra Taru) याला पोलिसांनी अटक केली.
Amedia land deal case:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या संबंधित अमेडिया कंपनीने मुंढव्यातील जमीन खरेदी केली होती. ही जमिन शासकीय असल्याचे उघडकीस आले आहे. या जमीन खरेदीचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी आता जमीन खरेदी खत व्यवहार करणाऱ्या दुय्यम निबंधक रवींद्र तारु (Ravindra Taru) याला पोलिसांनी अटक केली. बावधन पोलिसांनी ही अटक केलीय. या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवाणी (Shital Tejvani) हिला पोलिसांनी अटक केलेली आहे. तिच्याकडे चौकशी सुरू आहेत. त्यानंतर आता मुद्रांक विभागाचा दुय्यम निंबधक रवींद्र तारुला अटक करण्यात आलीय.
मोठी बातमी : सप्तश्रृंगी गडावरील दरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
भोरमधील राहत्या घरातून अटक
रविंद्र बाळकृष्ण तारु (वय 58) हे मूळचे भोरमधील आहेत. ते हवेली येथे दुय्यम निंबधक म्हणून नोकरी करतात. मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी भोरमधील राहत्या घरातून रविंद्र तारु यांना बावधन पोलिसांनी अटक केलीय. गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर रविंद्र तारु यांना या जमिनीचे खरेदी खत केले होते म्हणजेच दस्त नोंदविला होता. त्यामुळे या गुन्ह्याचा तपासासाठी त्यांना अटक केल्याची माहिती बावधन पोलिसांनी दिली.
शीतल तेजवाणीला वर्ग करून घेणार
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवाणी ही आहे. तिला एका गुन्ह्यात पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. ते सध्या पोलिस कोठडीत आहे. तिची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला या गुन्ह्यात वर्ग करून घेतले जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. तिला या गुन्ह्यात वर्ग केल्यानंतर तिच्याकडे चौकशी केली जाणार आहे.
चाळीस एकर जमिनीची बेकायदेशीर खरेदी
मुंढवा येथील शासकीय जमीनची बेकायदेशीर खरेदी केल्याचे प्रकरण आहे. चाळीस एकर शासकीय जमीन बनावट कागदपत्रे तयार करून हस्तांतरीत केली. तसेच मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विकण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दिग्विजय पाटील, कुलमुखत्यार शीतल तेजवणी, सब रजिस्टर रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आता शीतल तेजवणी, रवींद्र तारु यांना अटक झालीय. दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीत भागीदार असून, ते अजित पवार यांचे नातेवाइक आहेत.
