Video : मुंढवा जमीन व्यवहारात पार्थने तुम्हाला विचारलं नाही का?, अजित पवारांचा एका वाक्यात उत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंढवा जमीन व्यवहाराबाबत पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाली होती की नाही असा प्रश्न विचारला.
मुंढवा जमीन व्यवहारात पार्थ पवार यांनी 300 कोटी रुपयांचा व्यवहार केला, (Ajit Pawar) त्यावेळी आपल्याला विचारलं नाही का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा व्यवहारच झाला नव्हता असं सांगत त्या विषयावर अधिकच भाष्य करण टाळलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना विकत घेण्याच्या घोटाळा गाजत आहे.
या संदर्भात अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांच्या कंपनीने ही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी अवघी ५०० कोटींची स्टँम्प ड्युटी भरली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. या प्रकरणात तिघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याने टीका होत आहे. या संदर्भात अजित पवार यांनी या प्रकरणात सांगितले की रजिस्टार कार्यालयात कागदपत्र करताना जे तिघा जणांच्या सह्या झाल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात शासनाच्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ती या प्रकरणाचा तपास करून एक महिन्यात अहवाल देणार आहे त्यानंतर आणखी कोणी दोषी असेल तर कारवाई होईल असे अजित पवार यांनी आज सांगितले आहे. मुळात या शीतल तेजवाणी यांनी २००६ मध्ये १९ वर्षांपूर्वी या जमीनीची पॉवर ऑफ एटर्नी घेतली आहे.त्यावेळी पाच कोटीची किंमत दाखवली आहे. या प्रकरणात आता चौकशी होऊन समितीच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे.
एडीशन चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू, पुण विभागीय महसुल आयुक्त, जिल्हाधिकारी, जमाव बंदी आयुक्त यांची कमिटी याची एक महिन्याची मुदत दिली आहे.पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊ नयेत आणि शासनाचीही फसवणूक होऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे. कोणतीही जमीन खरेदी करताना टॉपचे वकील याची तपासणी करत असतात. त्यानंतर पावले पुढे टाकली जात असतात. अशा जमीनीबाबत हरकती आणि सूचना मागवण्यासाठी नोटीस दिली जाते. या जमीनीचा व्यवहार करताना अशी कोणतीही काळजी घेतली नाही. आपल्याला यातले काहीच माहिती नव्हते. जर मला दाखवले असते तर मीच सांगितले असते असला व्यवहार करु नका असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
