Ajit Pawar : अजितदादांचा फोन कॉल की राजकारणाचा नवा सापळा?

  • Written By: Published:
Ajit Pawar

प्रतिनिधी : प्रशांत गोडसे

Ajit Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, भरपाईचे प्रश्न यावर चर्चा व्हायला हवी असताना सध्या करमाळा येथील एका फोन कॉलने राजकारणात मोठा गदारोळ माजवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलिस अधिकाऱ्यामधील संभाषण व्हायरल झाल्याने सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना जोर आले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांचा स्वभाव थेट, स्पष्ट आणि थोडासा कठोरपणे बोलणारा असल्याचं गेल्या चार दशकांत महाराष्ट्राने पाहिलं आहे. अनेकदा ते सहज बोलले तरी समोरच्याला ते रागावलेत असं वाटतं. करमाळा प्रकरणातही काहीसं असंच घडलं असून महिला अधिकाऱ्याची कोणतीही चूक नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन अजितदादांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCPSP) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अजितदादा हे स्पष्टवक्ते नेते आहेत. त्यांनी सहज केलेल्या संभाषणाला वेगळं रूप देऊन त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण महाराष्ट्र त्यांना चांगलंच ओळखतो. खरी चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्हायला हवी, फोन कॉलसारख्या किरकोळ गोष्टींवर नव्हे.”

महाराष्ट्रात फक्त देवाचा ‘न्याय’ चालेल

भाजपाचे आचार्य तुषार भोसले यांनी एक ट्विट करत नवीन वादाला तोंड फोडला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रात फक्त देवाचा ‘न्याय’ चालेल ! नो ‘भाई’गिरी ॲण्ड नो ‘दादा’गिरी !! असं म्हणत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावलं आहे.

 “कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता”

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत आपले स्पष्टीकरण दिले आहे. “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता,” असे अजित पवार म्हणाले.

झोया ज्वेल्स च्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली

दरम्यान, राजकीय जाणकारांच्या मते या प्रकरणाला मित्रपक्षांकडूनच हवा दिली जात असून, “आपल्याच लोकांकडून सापळा रचला जातोय” अशीही कुजबुज आहे. पण शेवटी प्रश्न असा की फोन कॉलचा हा गदारोळ किती दिवस राजकारणात चर्चेत राहणार आणि शेतकऱ्यांचे खरे प्रश्न अजून किती दिवस थांबणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube