मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? अजित पवारांनी दिले संकेत

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? अजित पवारांनी दिले संकेत

Ajit Pawar on Local Government Elections :सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही प्रक्रिया दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. लवकरच या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत एक वेगळेच विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Government Elections) पुन्हा लांबणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Donald Trump यांना दणका! हार्वर्ड विद्यापीठाचा निधी रोखण्याचा निर्णय न्यायालयाने फिरवला..

नेमकं काय म्हणाले अजित पवार (Ajit Pawar)?

अजित पवार (Ajit Pawar) एका कार्यक्रमात भाषण करत होते. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर (Local Government Elections) भाष्य केले. या भाषणाद्वारे ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. अजित पवार म्हणाले की, “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही पण जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे. याचा फायदा तुम्हाला निवडणुकीत होईल. तुम्ही चांगलं काम करा. अधीच निवडणुका व्हायला हव्या होत्या. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्यानं निवडणुका लांबल्या. महाराष्ट्रात जिल्ह्याचा पंचायतराजमध्ये पहिला नंबर आणा असंही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक

सर्व घटकांना प्रतिनिधित्त्व मिळायला हवे

अजित पवार यांनी यावेळी लांबत चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही (Local Government Elections) भाष्य केले. “निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. 2017 सालानंतर 2022 साली निवडणुका होणे गरजेचे होते. मात्र नंतरची 2022, 2023, 2024 साल गेलं. आता 2025 हे वर्षही संपायची वेळ आली आहे. या निवडणुका लांबण्यामागे काय कारणं आहेत याच्या खोलात मी जात नाही”, असे भाष्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. तसेच “सर्व घटकांना प्रतिनिधित्त्व मिळायला हवे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबली”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या विधानाचे आता अनेक वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Government Elections) निवडणुका लांबणार की काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, निवडणुका जानेवारीपर्यंत लांबल्या तर काय होईल? यात कोणकोणत्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांच्या या विधानाने विविध चर्चांना उधाण आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube