संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्यासाठी सज्ज! स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडेंची महाराष्ट्र टूर…
Mandar Bhide हे नाव सध्या स्वतंत्र शो असो किंवा एखाद्या चॅनल वर जाऊन केलेला हास्यजत्रा सारखा कार्यक्रम असो या सगळ्यात अग्रगण्य आहे.
Ready to make the whole of Maharashtra laugh Stand-up comedian Mandar Bhide’s Maharashtra tour : दोन तास एकाच माणसाने स्टेजवरून बोलत रसिकांना हसवून त्यांचं मनोरंजन करणं सोप्प नाही. पण अश्यातच हल्ली अनेक स्टँडअप कॉमेडियन यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात. मग ते स्वतंत्र शो असो किंवा एखाद्या चॅनल वर जाऊन केलेला हास्यजत्रा सारखा कार्यक्रम असो कॉमेडी करून हसवण हे काही सोप्पं काम नक्कीच नाही आणि या सगळ्यात सध्या अग्रगण्य असलेलं नाव म्हणजे कॉमेडियन मंदार भिडे
अक्षय कुमारने शेअर केला ‘भूत बंगला’चा भीतीदायक पोस्टर, उद्या येणार टीझर
त्यांचा विनोदच अचूक टाईम आणि अगदी लहानग्या पासून आजी आजोबांना खळखळून हसवून त्यांच मनोरंजन करणं हे मंदारला उत्तम जमत यात शंका नाही. कॉर्पोरेट मधली बड्या पगाराची नोकरी सोडून पूर्ण वेळ स्टँडअप करणं हा निर्णय त्यांनी काही वर्षा आधी घेतला आणि आता हे संपूर्ण महाराष्ट्राच मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.
पुण्यात धक्कादायक प्रकार, परीक्षेपूर्वीच दहावीचा गणित पेपर ‘टेलिग्राम’वर व्हायरल; गुन्हा दाखल
महाराष्ट्र टूर बद्दल बोलताना मंदार सांगतो ” आजवर अनेक ठिकाणी परफॉर्म केलं पण आपल्या महाराष्ट्रात विविध शहरात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेटणं हा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे. दर बारा कोसावर बदलणारी भाषा आपल्या महाराष्ट्रात असल्याने तिथे जाऊन प्रेक्षकांच स्टँड अप च्या माध्यमातून मनोरंजन करणं हे तितकच आव्हानात्मक देखील आहे. माझा शो हा क्लीन कॉमेडी असल्याने अगदी तुम्ही तुमचा आई बाबा / आजी आजोबां सोबत येऊन स्टँड अप बघावं असा आहे यातून आपल्या पेक्षा मोठा लोकांना हा स्टँड अप फॉरमॅट ओळखीचा व्हावा हा देखील या मागचा उद्देश आहे”
भारताचे आभार! ३०० अब्ज डॉलर्सच्या करारानंतर खूश झाले ट्रम्प; रिलायन्सचा खारीचा वाटा
मंदार भिडे लवकरच महाराष्ट्र टूर करणार असून आता प्रत्येक शहरात ते जाऊन शो करणार आहे ही महाराष्ट्र टूर नक्की कधी सुरू होणार कुठे शो होणार या बद्दल अद्याप माहिती गुलदस्त्यात आहे पण मंदार भिडे यांचे अगदी जगभरात चाहते आहेत आणि त्यांच्या शो ला जाऊन हास्याचा धबधबा अनुभवायची संधी आता प्रत्येकाला मिळणार आहे. कोकणापासून ते पार पुणे नाशिक अश्या विविध शहरात त्यांचे शो होणार असल्याचं कळतंय त्यामुळे आता चाहते देखील त्यांचा महाराष्ट्र टूर साठी तितकेच उत्सुक असल्याचं दिसतंय.
