सद्य:स्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलं आहे.
अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले आहे. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही पण जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे". असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.