मोठी बातमी! दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला; एका भारतीयासह चार जण जखमी
Dubai International Airport : गेल्या बारा दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान युद्ध सुरु असून अमेरिका आणि इस्त्रायल संयुक्तपणे
Dubai International Airport : गेल्या बारा दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान युद्ध सुरु असून अमेरिका आणि इस्त्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहे तर दुसरीकडे अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून इराण इस्त्रायलसह अमेरिका समर्थन अरब देशांमधील अमेरिकन तळांवर हवाई हल्ले करताना दिसत आहे.
तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळले आहेत, ज्यामध्ये एक भारतीय जखमी झाला आहे.
दुबई मीडिया ऑफिसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. आज, बुधवार, 11 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1:08 वाजता केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dubai International Airport) काही काळापूर्वीच दोन ड्रोन कोसळले.
Authorities confirm that two drones fell in the vicinity of Dubai International Airport (DXB) a short while ago, resulting in minor injuries to two Ghanaian nationals and one Bangladeshi national, and moderate injuries to one Indian national. Air traffic is operating as normal.
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 11, 2026
पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ड्रोन अपघातात घानाचे (Ghana) दोन नागरिक आणि एक बांगलादेशी (Bangladesh) नागरिक जखमी झाले आहेत. त्यात असेही म्हटले आहे की एका भारतीयालाही किरकोळ दुखापत झाली आहे. विमानतळावरील सामान्य कामकाज सुरू असल्याचेही वृत्त आहे.
सुरुवातीच्या माहितीनुसार, इराणने सोडलेले दोन्ही ड्रोन दुबई विमानतळाजवळ कोसळले. ड्रोन अपघातात एकूण चार लोक जखमी झाल्याचे दुबई मीडिया ऑफिसने वृत्त दिले आहे.
दुबई विमानतळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील सर्व सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत. हवाई वाहतूक सुरळीत सुरू आहे, म्हणजेच टेकऑफ आणि लँडिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही.
