सत्तेची पोळी भाजली! मराठा आरक्षणाच्या ‘जीआर’वरून रोहित पवारांनी सरकारलं घेरलं, आंदोलकांची फसवणूक…

Rohit Pawar Criticize Mahayti Government : मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल एक जीआर (Government Resolution) काढला. यामुळे मराठा समाजाला (Maratha Reservation) दिलासा मोठा मिळाला आहे. मात्र, हा विजय केवळ मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचाच आहे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) केलं आहे. त्यांनी याबाबत समाजाचं अभिनंदन करताना महायुती सरकारवर (Mahayti Government) जोरदार टीका केली.
रोहित पवार यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, मंत्रिमंडळ उपसमिती आधीही होती आणि आजही आहे. या समितीत मराठा नेत्यांसह गिरीश महाजन तर काल व्यासपीठावर जयकुमार गोरे हे ओबीसी नेते होते. मग काल घेतलेला निर्णय सर्वमान्य होता तर तोच निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी का घेतला नाही? तीन महिने आधीच आंदोलनाचा इशारा दिला गेला होता, तरी सरकारने तेंव्हाच कार्यवाही का केली नाही? न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच मंत्रिमंडळ उपसमिती का सक्रीय झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एसटीच्या जमिनींच्या विकासात श्रमिक संघटनांचा सहभाग आवश्यक – महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
सरकारचा उद्देश होता का?
पुढे त्यांनी म्हटलं की, मुंबईकरांची आणि आंदोलकांची गैरसोय व्हावी, हाच सरकारचा उद्देश होता का? न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जे काम करत होती, तेच काम आता ‘हैदराबाद गॅझेट’ या नावाखाली जीआरद्वारे केलं जात आहे. या जीआरवर अनेक शंका उपस्थित आहेत, त्यावर सरकार उत्तर देणार आहे की नाही? असे सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलाय.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल काढलेल्या #GR मुळं मराठा समाजाचा विजय झाला असेल तर तो पूर्णतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचा आहे. याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन!
पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात. मंत्रिमंडळ…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 3, 2025
मराठा समाजाला फसवलं
रोहित पवारांनी सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित करताना म्हटलं की, लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन नवी मुंबईत मराठा समाजाला आश्वासनं देऊन फसवलं होतं. तसंच आत्ताही जीआरमधील आश्वासनांच्या कालमर्यादा पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी आंदोलकांची फसवणूक केली जात नाही ना, हे पाहणं आवश्यक आहे. नवी मुंबईतील फसवणुकीची पुनरावृत्ती होणार नाही, हीच अपेक्षा आहे.
सत्तेची पोळी भाजली…
सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, या सरकारने दोन समाजात वाद निर्माण करून केवळ सत्तेची पोळी भाजली आहे. त्यामुळे सरकारने ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावल्याबद्दल जनतेची माफी मागायला हवी. महाराष्ट्राला चाणक्यनीतीची नाही, तर माणुसकीची नीती व महाराष्ट्रधर्माची गरज आहे. त्यामुळे सरकारने पुढे शेतकरी, युवा, मध्यमवर्गीय आणि जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर काम करायला हवं.