स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

Advocate Anjali Awasthi : भारतीय टेलिव्हिजनमध्ये स्टार प्लस हे चॅनल नेहमीच एक अग्रगण्य वाहिनी म्हणून ओळखलं जातं. विविध शैलींमधील दमदार

Advocate Anjali Awasthi

Advocate Anjali Awasthi : भारतीय टेलिव्हिजनमध्ये स्टार प्लस हे चॅनल नेहमीच एक अग्रगण्य वाहिनी म्हणून ओळखलं जातं. विविध शैलींमधील दमदार मालिका सादर करून कौटुंबिक कथांपासून ते सामाजिक बदल घडवणाऱ्या आणि प्रभावी संदेश देणाऱ्या गोष्टींपर्यंत या वाहिनीने अशी अनेक पात्र आणि क्षण निर्माण केले आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. स्टार प्लस च्या अशाच मालिकांपैकी एक म्हणजे प्रेक्षकांच्या मनाला खोलवर स्पर्श करणारी “अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी” ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे.

या मालिकेत मुख्य भूमिकेत श्रितमा मित्र (Shritama Mitra) असून तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. स्टार प्लस चॅनल वर सर्वाधिक लोकप्रिय मालिकापैकी असलेली ही मालिका म्हणून तिने आपले स्थान निर्माण केल आहे. अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थीच्या (Advocate Anjali Awasthi) भूमिकेतील तिच्या अभिनयाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या मालिकेच्या निर्मात्यांनी एक प्रभावी नवा टीझर सादर केला असून अंजलीच्या प्रवासातील मोठ्या वळणाची चाहूल यातून बघायला मिळणार असल्याचं कळतंय.

टीझरची सुरुवात न्यायालयाच्या दालनातून आत्मविश्वासाने चालणाऱ्या अंजलीने होते. वकिलांचा काळा कोट परिधान केलेली अंजली ही लक्षवेधी ठरते आणि अंजली ठामपणे पुढे चालताना आणि तिच्यामागे उभा असलेला प्रचंड जनसमुदाय बघायला मिळतो. पार्श्वसंगीतातील निवेदन तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक देतो न्यायासाठी असंख्य लढे लढलेली ही महिला आता आवाज नसलेल्यांचा आवाज बनण्यासाठी सज्ज आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by StarPlus (@starplus)

या टीझर मधून स्पष्टपणे सूचित होते की, अंजलीच्या प्रवासात काहीतरी मोठं घडणार आहे. अद्याप या बद्दलचे तपशील गुप्त ठेवले असले तरी एक गोष्ट नक्की आहे की एक शक्तिशाली नवे पर्व सुरू होणार असून ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, या गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त स्टार प्लस वर ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ !

बॉक्स ऑफिसवर प्रभासचा दबदबा; 100 कोटींच्या ओपनिंगचा खरा सम्राट

follow us