ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला
‘सुपर डुपर’ या बहुचर्चित चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून टीझरनंतर आता ‘सुट्टा रोल’ हा धमाकेदार पार्टी ट्रॅक प्रदर्शित झाला आहे.
‘Sutta Roll’ party track to meet the audience : यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मनोरंजनाची मेजवानी ठरणारा भव्य कौटुंबिक सिनेमा ‘सुपर डुपर’ 3 एप्रिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुचर्चित चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून टीझरनंतर आता ‘सुट्टा रोल’ हा धमाकेदार पार्टी ट्रॅक प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला रोहित राऊत, जुईली जोगळेकर आणि अभिनय जगताप यांचा जबरदस्त आवाज लाभला असून अभिनय जगताप यांच्या संगीतामुळे गाणे आणखीच रंगतदार झाले आहे. तसेच समीर आशा पाटील यांच्या शब्दांनी तरुणाईच्या भावना अचूक पकडल्या आहेत.
तरुणाईकडून या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळत असून हाय-एनर्जी म्युझिक, दमदार बीट्स, क्लब वाईब आणि आकर्षक चित्रीकरणामुळे हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग ठरत आहे. यात ललित प्रभाकर आणि विदुला चौघुले यांचा स्टायलिश व ग्लॅमरस अंदाज विशेष लक्ष वेधून घेतो. ललितचा कूल, कॉन्फिडंट लूक आणि विदुलाचा बोल्ड, अट्रॅक्टिव्ह अवतार यामुळे स्क्रीनवर वेगळीच ऊर्जा जाणवते. दोघांची केमिस्ट्री आणि बिनधास्त सादरीकरण गाण्याची रंगत दुप्पट करते.
राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट! शरद पवार यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे रिंगणात
‘सुट्टा रोल’मधील त्यांचा अंदाज पाहाता, ललित साकारत असलेला बेधडक, मस्तीखोर आणि हटके स्वभावाचा तरुण तर विदुला साकारत असलेली आत्मविश्वासू, स्टायलिश आणि स्वतःच्या अटींवर जगणारी मुलगी अशी झलक यातून स्पष्ट होते. या जोडीची धमाल पुढे काय रंगत आणेल, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “या गाण्यातून ललित आणि विदुलाच्या पात्रांचा अंदाज प्रेक्षकांना येतो. त्यांची बिनधास्त जोडी पुढे काय धमाल करणार आहे, हे पाहाणे नक्कीच रंजक ठरेल. ‘सुट्टा रोल’ तरुणांसाठी पार्टी अँथम ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.’’
झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स तथा सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित आणि समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर’मध्ये निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते तसेच मुख्य भूमिकेत ललित प्रभाकर आणि विदुला चौघुले अशी भव्य स्टारकास्ट झळकणार आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते असून उमेश कुमार बन्सल व बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.
